मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local : मुंबई लोकल आणखी फार्स्ट होणार! टिळक नगरहून निघालेली गाडी पाच मिनिटं आधीच पनवेलला पोहोचणार

Mumbai Local : मुंबई लोकल आणखी फार्स्ट होणार! टिळक नगरहून निघालेली गाडी पाच मिनिटं आधीच पनवेलला पोहोचणार

Jun 26, 2024 07:43 PM IST

Harbour Line Train Speed Up: मध्य रेल्वेने हार्बर लाइन ट्रेनचा वेग वाढवला आहे. यामुळे टिळक नगरहून पनवेल असा प्रवास करणाऱ्या प्रवशांचा आणखी वेळ वाचणार आहे.

मुंबई लोकलच्या वेग मर्यादेत बदल करण्यात आला.
मुंबई लोकलच्या वेग मर्यादेत बदल करण्यात आला. (PTI)

Central Railway: मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर (Harbour Line) टिळक नगर ते पनवेल दरम्यान (Tilak Nagar to Panvel) धावणाऱ्या गाड्यांचा वेग ताशी ८० किमी प्रतितासवरून ९५ किमी प्रतितास केला आहे. याबाबत ३ जून २०२४ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. मात्र, कालपासून (२५ जून २०२४) या गाड्यांचा वेग वाढवण्यात आला. प्रवासाच्या वेळेत ५ मिनिटांपर्यंत बचत करणे हे यामागचे उद्देश आहे.

मध्य रेल्वेवर दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान १८८ आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बेलापूर ७९ गाड्या धावतात. सीएसएमटी-पनवेल दरम्यान प्रवास करण्यासाठी ८० मिनिटे आणि सीएसएमटी-बेलापूर दरम्यान ६५ मिनिटे लागतात. सुरुवातीच्या प्रस्तावात १०५ किमी प्रतितास वेग वाढवण्याची सूचना करण्यात आली. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव जास्तीत जास्त ९५ किमी प्रतितास वेगासाठी मान्यता देण्यात आली. मध्य रेल्वेचे प्रमुख पीआरओ स्वप्नील निला म्हणाल्या की, " मध्य रेल्वेने मंगळवारपासून हार्बर लाइनसाठी नवीन वेग मर्यादा लागू करण्यास सुरुवात केली आहे."

ट्रेंडिंग न्यूज

मध्य रेल्वेचे अधिकारी काय म्हणाले?

मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन गाड्यांमधील सुरक्षित अंतर राखण्यासाठी १०५ किमी प्रतितास अपुरे होते. त्यामुळे ९५ किमी प्रतितास इतका वेग मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मध्य रेल्वेने ट्रक आणखी बळकट आणि ओव्हरहेड इक्विपमेंटमध्ये आवश्यक बदल केले आहेत.

सीसीएमटी- टिळक नगर दरम्यानच्या गाड्या आधीच्या वेगाने

महत्त्वाचे म्हणजे, छत्रपती शिवााजी महाराज टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या गाड्या आधीच्या वेग मर्यादानुसारच धावतील. टिळक नगर आणि वडाळा दरम्यानच्या ट्रॅकच्या दोन्ही बाजूला झोपडपट्या आहेत. याठिकाणी अपघाताची शक्यता टाळता येत नाही. तर, चुनाभट्टी-कुर्ला-टिळक नगर मार्गावर अनेक लेव्हल क्रॉसिंग गेट्स आहेत.

WhatsApp channel
विभाग