Mumbai News: भाईंदरमध्ये दिवसाढवळ्या भाजपच्या कार्यकर्त्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत भाजप कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्ली परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक लोकांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजन पांडे असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. राजन पांडे हा स्थानिक भाजप युवा शाखेचे सचिव आहे. दरम्यान, शुक्रवारी शिवसेना गल्ली परिसरात राजन पांडे आणि आरोपी विनोद यांच्यात काही कारणांवरून वाद झाला. त्यानंतर वाद मिटण्याऐवजी पेटला. यानंतर राजभर याने पांडे याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला.
या हल्ल्यात राजनच्या पोटावर गंभीर जखमा झाल्या. रक्तबंबाळ झालेल्या पांडे यांना मीरा रोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात पांडेचा मित्रही जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना रहिवाशांनी मोबाईलमध्ये कैद केले. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्याने स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. गुटखा तस्करीच्या अवैध धंद्यात पांडेचा सहभाग असल्याचा संशय असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पूर्व वैमन्यस्यातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अनैतिक संबंधातून एका महिलेने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातील टॉयलेटमध्ये पुरला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून पुढील चौकशीला सुरूवात केली. खचवाना गावातील रूपराम (वय, ४२) आपल्या घरातून १६ दिवसापासून बेपत्ता होता. याप्रकरणी रुपरामच्या नातेवाईकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चौकशीदरम्यान, पोलिसांना रुपरामच्या पत्नीवर संशय आला. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. हत्येमागचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नसून अनैतिक संबंधातून आरोपी महिलेने पतीची हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.