Mumbai Aarey Forest News: मुंबईच्या आरे जंगलातून अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली. आर जंगलातील तलावात शनिवारी सकाळी बिबट्याची कातडी आणि नखांचे तुकडे आढळून आल्याने प्रशासनात खळबळ माजली. एका कर्मचाऱ्याला जंगलाच्या मरोळ बाजूला असलेल्या तलावात बिबट्याची कातडी आणि नखे एका कपड्यात गुंडाळलेली आढळली. यानंतर त्याने यासंदर्भात वरिष्ठांना माहिदी दिली.
आरे जंगलातील तलावात बिबट्याची कातडी आणि नखे आढळून आली. याप्रकरणी मुंबई परिक्षेत्रातील वन अधिकारी आवश्यक कारवाई करतील. कारण हे शिकार किंवा अवैध वन्यजीव व्यापाराचे प्रकरण असल्याचे दिसते, असे रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअरचे संस्थापक आणि अध्यक्ष पवन शर्मा यांनी सांगितले. तपासाचा एक भाग म्हणून विभाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे येथील बिबट्यांचा सध्याचा डेटाबेस तपासत आहे, अशीही त्यांनी माहिती दिली. मुंबईसह देशभरात बिबट्याची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. या बिबट्यांचे सरंक्षण करण्यासाठी वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या अनुसूची १ अंतर्गत दोषींवर कठोर कारवाई केली जाते.
नाशिकच्या गुलमोहर कॉलनीजवळ बिबट्या वावरताना दिसला. या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. बिबट्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या बिबट्याने मांजरीच्या पिल्लाची शिकार केल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.