Mumbai News: मुंबईच्या माहीम पश्चिम येथे बुधवारी (५ मे २०२४) संध्याकाळी एका निवासी इमारतीचा स्लॅब कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला. तर, एक जण जखमी झाला. जखमीला हिंदुजा रुग्णालयात पाठवले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बे स्कॉटिश शाळेजवळील दिलीप गुप्ते मार्गावरील एका मजली रिकाम्या इमारतीचा पहिल्या मजल्याचा मोठा स्लॅब कोसळला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही ढिगाऱ्यातून बाहेर काढून त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. मात्र, यातील एकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृताचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. चंद्रिका यादव (वय, ३२) असे जखमी झालेल्या महिलेची नाव आहे. चंद्रिका देखील मजूर आहे. सुरुवातीला तिला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण नंतर तिने स्वत:ला सायन रुग्णालयात हलवले.
मुंबईच्या विक्रोळी पूर्वेला तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळून दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना ३१ मे २०२४ रोजी सायंकाळी घडली. शरद म्हसलेकर (वय, ७५) आणि सुरेश माढाळकर (वय ७८) अशी मृतांची नावे आहेत. गुरुकृपा हाऊसिंग सोसायटीची तीन मजली इमारत दुरवस्थेत आहे.म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही इमारत १९७० च्या दशकात बांधण्यात आली होती. त्यामुळे ही इमारत ५० वर्षांहून अधिक जुनी आहे. ही इमारत जीर्ण अवस्थेत असून ती रिकामी करावी, अशी नोटीस आम्ही गेल्या वर्षी रहिवाशांना दिली होती. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
शेजारी राहणाऱ्या सीमा नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मी स्वयंपाक करत असताना शेजाऱ्यांनी येऊन आम्हाला स्लॅब कोसळल्याची माहिती दिली आणि मग आम्ही अग्निशमन दलाला फोन केला." मृत व्यक्ती तळ आणि दुसऱ्या मजल्यावरील रहिवासी होते. शेजाऱ्यांनी त्यांना जखमी अवस्थेत विक्रोळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
संबंधित बातम्या