Kurla Bus Accident video : मुंबईकरांची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसचा सोमवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. कुर्ला परिसरात भरधाव वेगात असलेल्या बेस्टने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४९ जण जखमी आहे. पाच जणांची नावे समजली असून आणखी दोघांची नावे समजू शकली नाही. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून धडकी भरवणारा हा व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी बसचालक संजय मोरे याला अटक केली आहे. तर संजय मोरे याला एलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नव्हता अशी देखील माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
सोमवारी रात्री कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर या ठिकाणी भरधाव बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. या बसने रस्त्यावर चालणाऱ्या तब्बल १० ते १२ जणांना चिरडलं. या घटनेत पाच जण ठार झाले आहेत. विजय विष्णू गायकवाड(वय ७०), आफ्रीन अब्दुल सलीम शहा (वय १९), अनम शेख (वय २०), कणीस फातिमा गुलाम कादरी (वय ५५), शिवम कश्यप (वय १८) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी बसचा चालक संजय मोरे यास अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा बसमध्ये तब्बल ६० प्रवासी होते.
सोमवारी रात्री कुर्ला स्टेशनहून बेस्टची एक बस निघाली होती. ही बस प्रवाशांनी भरलेली होती. या बसचे ब्रेक फेल झाल्याने चालक संजय मोरे याने ब्रेकवर पाय देण्याऐवजी एक्सलेटरवर पाय दिला. त्यामुळेच बसचा वेग वाढला. तसेच चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने या बसने कुर्ला स्टेशन आंबेडकर चौकापर्यंत बसने अनेक वाहनांना धडक दिली. तर अनेकांना चिरडले आहे. या घटनेत ७ जण ठार झाले तर ४९ पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहे. त्यांना होमी भाबा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
संबंधित बातम्या