konkan Railway Update : कोकण रेल्वे मार्गावर खेड जवळ कशेडी बोगद्यासमोर दरड कोसळल्याने याय मार्गावरील रेल्वे सेवा ही ठप्प झाली आहे. १५ तास उलटून देखील या मार्गावरील सेवा ही पुर्वत झाली नाही. त्यामुळे या मार्गावरील अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही वळवण्यात आल्या आहेत. तब्बल १२ तासांपेक्षा अधिक वेळ प्रवासी रेल्वेत अडकून पडले आहेत. तर अनेकांना खायला देखील मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दिवसापासून कोकणाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पवसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे ट्रॅकवर कोसळल्याने कोकण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे मार्गावरील दरड दूर करण्याचे काम सुरू असून पोकलेन मशीन घटनास्थळी दाखल झाले आहे. रुळावरील ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. पुढील काही तासांत हे काम संपवून या मार्गावरील रेल्वे सेवा पुन्हा सुरू केली जाईल अशी माहिती प्रशासननाने दिली आहे. मात्र, काल रात्री पासून अनेक प्रवासी या मार्गावर अडकून पडले असून त्यांना खायला आणि प्यायला देखील मिळालेले नाही. यात लहान मुळे आणि वृद्ध व्यक्तीचे मोठे हाल झाले आहेत. दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ८ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर १२ गाड्या या इतर मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एक्स्प्रेस रद्द
ट्रेन क्रमांक १०१०३ मुंबई सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक ११००३ मुंबई सीएसएमटी-मडगाव तुतारी एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक १०१०५ दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक ५०१०८ मडगाव-सावंतवाडी पॅसेंजर
ट्रेन क्रमांक ५०१०८ सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक ११००४सावंतवाडी - दादर तुतारी एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक १२१३४ मंगळुरू-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस
कोकणरेल्वे मार्गाने जाणाऱ्या पाटणा - वास्को दा गामा एक्सप्रेस (१२७४२) ही गाडी १३ तारखेला सुटली होती. ही गाडी मागे वळवून कल्याण - लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मार्गे वळवली जाणार आहे.
लोकमान्य टिळक (टी) - मंगळुरु सेंट्रल एक्स्प्रेस (१२६१९) प्रवास सुरू झाला होता. ही एक्स्प्रेस ट्रेन आता रोहा येथे अडकून पडली असून ती मागे वळवून कल्याण - लोणावळा - पुणे - मिरज - मार्गे पुढे जाणार आहे.
गांधीधाम- नगरकोइल जंक्शन एक्सप्रेस (१६३३५) ही गाडी १२ जुलै रोजी स्थानकातून निघाली होती. ही गाडी विन्हेरे येथे मागे वळवून कल्याण-लोणावळा-पुणे-मिरज-लोंडा-मार्गे पुढे मडगाव - ठोकूर - मंगळुरुला सोडली जाणार आहे.
निजामुद्दीन - एर्नाकुलम एक्सप्रेस (१२२८४) ही गाडी १३ जुलै रोजी निघाली होती. ही गाडी माणगावला पाठीमागून कल्याण-लोणावळा-पुणे-मिरज-लोंडा-मार्गे वळवली जाणार आहे.
लोकमान्य टिळक (टी) - तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस (१६३४५) चा प्रवास रविवारी सुरू झाला होता. ही गाडी करंजाडी येथून पाठीमागे जाईल व कल्याण मार्गे वळवण्यात येईल. लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव - ठोकूर - मंगळुरू जंक्शन - एर्नाकुलम.
पुणे जं. - एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा (२२१५०)रोजी सुरू झाला होता. ही गाडी आता कल्याण - लोणावळा - दौंड मार्गे वळवली जाणार आहे.
लोकमान्य टिळक (टी) - तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस (१६३४५) ही गाडी रविवारी निघाली होती. ही एक्सप्रेस ट्रेन आता कल्याण - लोणावळा - दौंड जंक्शन मार्गे वळवली जाणार आहे.
गांधीधाम - नागरकोइल एक्सप्रेस (१६३३५) ही ट्रेन कल्याण - लोणावळा - पुणे मार्गे वळवण्यात आली आहे.
एच. निजामुद्दीन - एर्नाकुलम जं. एक्सप्रेस (१२२८४) ही १३ जुलै रोजी सुटलेली गाडी कल्याण - लोणावळा - दौंड मार्गे वळवण्यात आली आहे.
उधना - मंगळुरू जंक्शन (०९०५७) ही गाडी रविवारी सुरू झाली असून ही गाडी कल्याण - लोणावळा - दौंड मार्गे वळवली आहे.
पटना वास्को द गामा एक्सप्रेस (१२७४२) ही गाडी कल्याण लोणावळा पुणे मिरज लोंडा-मडगाव मार्गे वळवली जाईल.
लोकमान्य टिळक (टी) मंगळुरु सेंट्रल एक्स्प्रेस (१२६१९) रोहा येथे सोडण्यात आली असून ती कल्याण- लोणावळा- पुणे- मिरज- लोंडा- मडगाव- ठोकूर मार्गे वळवली जाणार आहे.
गाडी क्र. १२१३३ मुंबई सीएसएमटी- मंगळुरु जं. एक्स्प्रेसचा आज २ वाजता पुन्हा शेड्यूल करण्यात येणार आहे. तर ट्रेन क्र. ११००३ दादर सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसचा प्रवास आज वेळापत्रकानुसार ३.५ वाजता पुन्हा शेड्यूल करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या