मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai kolhapur Vande Bharat : मुंबईतून आणखी एक वंदे भारत धावणार; आज उदघाटन, 'या' तारखेपासून धावणार

Mumbai kolhapur Vande Bharat : मुंबईतून आणखी एक वंदे भारत धावणार; आज उदघाटन, 'या' तारखेपासून धावणार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 11, 2024 12:39 PM IST

Mumbai kolhapur Vande Bharat : देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विस्तारण्यात येत आहे. मध्य रेल्वे मुंबई ते कोल्हापूर आणि पुणे ते वडोदरा या दोन वंदे भारत एक्सप्रेस गद्य सुरू करणार असून आज या दोन्ही गाड्यांचे उद्घाटन केले जाणार आहे.

मुंबईतून आणखी एका वंदे भारत धावणार; आज उदघाटन
मुंबईतून आणखी एका वंदे भारत धावणार; आज उदघाटन

Mumbai kolhapur Vande Bharat : देशभरातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ही स्थळे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत आता मुंबई ते कोल्हापूर दरम्यान मंगळवारपासून (दि १२) वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. या सोबतच पुणे ते वडोदरा ही वंदे भारत एक्सप्रेस देखील उद्या पासून धावणार असून याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. दरम्यान, या गाड्यांमुळे दोन्ही शहरांतिल अंतर आता कमी होणार असून कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची देखील सोय होणार आहे.

Mumbai Coastal Road: मुंबईतील कोस्टल रोड अखेर खुला! किती आहे वेग मर्यादा, कोणत्या वाहनांना बंदी? वाचा सविस्तर

मुंबईतून सध्या मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर आणि सीएसएमटी ते जालना या वंदे भारत एक्स्प्रेस सुरू आहेत. या गाड्या नंतर आता सीएसएमटीवरून कोल्हापूर जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवारपासून धावणार आहे. मुंबईतून सुटणारी ही पाचवी वंदे भारत एक्सप्रेस आहे. या सोबतच महाराष्ट्र आणि गुजरात जोडण्यासाठी पुणे-वडोदरा वंदे भारत एक्स्प्रेस देखील सुरू होणार असून ही गाडी पुणे आणि वसई रोडवरून जाणार आहे.

Nilesh Lanke News : अजित पवारांना मोठा दणका! आमदार नीलेश लंके मोठ्या पवारांसोबत जाणार

सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे देशात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात केली जाणार आहे. मुंबई-कोल्हापूर वंदे भारत गाडी साठी मुंबई आणि पुणे रेल्वे विभागाने जय्यत तयारी केली आहे.

पुण्यातून वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी मेंटनेस सुविधा आणि ‘इलेक्ट्रिक पीटलाइन’ असणे आवश्यक आहे. घोरपडी येथील कोचिंग कॉम्प्लेक्स येथे ही सर्व यंत्रणा तयार करण्यात आली आहे. या सोबतच याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. या दोन्ही गाड्या प्रवाशांसाठी फायद्याच्या ठरणार आहेत.

 

IPL_Entry_Point