मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai-Kolhapur flight : मुंबई-कोल्हापूर विमानसेवेला मुहूर्त मिळाला, ‘या’ तारखेपासून फेऱ्या सुरू
मुंबई-कोल्हापूर विमानसेवेला मुहूर्त मिळाला
मुंबई-कोल्हापूर विमानसेवेला मुहूर्त मिळाला

Mumbai-Kolhapur flight : मुंबई-कोल्हापूर विमानसेवेला मुहूर्त मिळाला, ‘या’ तारखेपासून फेऱ्या सुरू

03 September 2022, 20:33 ISTShrikant Ashok Londhe

 मुंबई-कोल्हापूर विमानसेवेवर (Mumbai Kolhapur flight) अखेर  शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.

कोल्हापूर – मुंबई ते कोल्हापूर विमान सेवा (Mumbai Kolhapur flight)  सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत होती. आज केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिकही उपस्थित होते. या बैठकीत मुंबई-कोल्हापूर विमानसेवेवर (Mumbai Kolhapur flight) अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

चंद्रकांत पाटील यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती देताना सांगितले की, कोल्हापूर मुंबई विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कोल्हापूर ते मुंबई आणि कोल्हापूर ते बंगळूर विमानसेवा सुरु करण्याची मागणी केंद्रीय उड्डाण मंत्री शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. त्याचबरोबर कोल्हापुरातून मुंबईला सकाळची स्वा देण्याची मागणी करण्यात आली होती. जेणेकरून एका दिवसांत मुंबईतील काम आटोपून परत कोल्हापूरला येता यावे. 

कोल्हापूर-मुबंई विमानसेवा सुरु होण्यासाठी स्लॉट मिळणे खूप महत्वाचे होते. अदानी व्यवस्थापनाकडून येत्या ५ ऑक्टोबरपासून सकाळचा स्लॉट उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. त्यामुळे नवरात्री उत्सवात कोल्हापुरकरांना विमानसेवेची भेट मिळाली आहे. कोल्हापुरातून सकाळी १० वाजण्याच्या सुमारास विमान कोल्हापूरला जाईल. 

खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले की, अकासा आणि स्टार एअरलाईन्सने कोल्हापुरातून जाण्यासाठी सकाळी तर मुंबईहून परत कोल्हापूरला येण्यासाठी सायंकाळची वेळ मागितली होती. याला अदानी ग्रुपने परवानगी दिली आहे. या बैठकीत कोल्हापुरातून गोव्यालाही कनेक्टिव्ही असावी, अशी मागणी केली होती. याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. त्यामुळे  येत्या काळात मुंबई, बंगळूर आणि गोवा या ठिकाणी विमानसेवा सुरु होईल.  कोल्हापुरातून मुंबईला आठवड्यातून पाच दिवस विमानसेवा सुरु राहील.