मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kandivali Firing: दहीहंडीवेळी झालेला वाद उफाळला; मुंबईत गोळीबारात एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Kandivali Firing: दहीहंडीवेळी झालेला वाद उफाळला; मुंबईत गोळीबारात एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 01, 2022 08:27 AM IST

Kandivali Firing: गोळीबार केल्यानंतर दुचाकीवरून आलेले तरुण फरार झाले. ज्यांच्यावर गोळीबार केला त्यांच्या शेजारीच ते राहत असल्याचंही सांगण्यात येत आहे.

कांदिवलीत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला हवेत गोळीबार
कांदिवलीत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला हवेत गोळीबार

Kandivali Firing: मुंबईत कांदिवलीमध्ये मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चार तरुणांवर गोळीबार केल्यानं खळबळ उडाली. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. जखमी तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास ही घनटा घडली. दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये अंकित यादव या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर तिघेजण जखमी झाले आहेत. गोळीबार करणारे आणि ज्यांच्यावर गोळीबार झाला ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोन्हींमध्ये दहीहंडीवेळी वाद झाला होता. त्याच वादातून हा गोळीबार झाल्याचं सांगण्यात येत आहे.

गोळीबारात अंकित यादवचा मृत्यू झाला तर अविनाश दाभोळकर, मनिष गुप्ता, प्रकाश नारायण हे जखमी झाले आहेत. तिघांवर शताब्दी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. तिघांचीही प्रकृती ठीक असून कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितले.

कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. प्राथमिक तपासात चार राऊंड गोळीबार झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच गोळीबार केल्यानंतर दुचाकीवरून आलेले तरुण फरार झाले. ज्यांच्यावर गोळीबार केला त्यांच्या शेजारीच ते राहत असल्याचंही सांगण्यात येत आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या