Mumbai kandivali Crime news : मुंबईत कांदिवली परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला एक पेढा खाणे चांगलेच महागात पडले आहे. हा पेढा खाल्ल्यावर व्यापऱ्याला ५० लाख रुपये गमवावे लागले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या व्यापाऱ्याने पोलिसांत धाव घेतली असून या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कैलास चौधरी असे फसवणूक झालेल्या व्यापऱ्याचे नाव आहे. चौधरी यांचा किराणा मालाचा व्यवसाय असून त्यांना पैसे दुप्पट करण्याचा मोह नडला आहे. आरोपींनी त्यांना पूजा पाठ करण्यास सांगून हातचलाखी करून ५० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
कैलास चौधरी हे किराणा व्यावसायिक असून त्यांच कांदिवली येथे ओम एन्टरप्रायजेस हे किराणा मालाचं दुकान आहे. त्यांना चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र, त्यांच्या प्रमोद डब्बू नावाच्या एका मित्राने त्यांना झटपट श्रीमंत होण्याचं आमिष दाखवलं. प्रमोद डब्बू एक दिवस चौधरी यांच्या दुकानात सामान घेण्यासाठी आला असतांना त्याने आरोपी शिवकुमार यादव व त्याचे काही सहकारी झटपट पैसा दुप्पट करुन देतात, अशी बतावणी केली.
चौधरी यांनी आधी प्रमोदवर विश्वास ठेवला नाही. मात्र, आरोपींनी त्यांना आधी प्रात्यक्षिक बघा मग पैसे द्या, असं आमिष दाखवलं. याला चौधरी हे बळी पडले. प्रमोद कैलासने चौधरी यांना ऑक्टोबर महिन्यात गोरेगाव येथे नेले. यावेळी एका खोलीत सूर्यबाबा, शिवकुमार यादव व त्याचे काही साथीदार बसले होते. ज्यांना प्रात्यक्षिक बघायचं असेल त्यांनी वहीत पैसे ठेवावे व शांत बसावे, असं आरोपी सूर्यबाबाने सांगितलं. कैलास चौधरीने देखील दोनशे रुपये वहीत ठेवले. यावेळी भोंदु सूर्यबाबाहे हातचलाखी करत पैसे दुप्पट केले. यामुले कैलास यांना पैसे दुप्पट होत असल्याचा विश्वास बसला. त्यामुळे चौधरी यांनी त्यांच्या जवळील पैसे हे दुप्पट करण्याचं ठरवलं. त्यांनी काही पैसे मित्रांकडून व त्यांच्या जवळचे ३० लाख असे ५० लाख रुपये शिवकुमार यादवला दिले.
पैसे दुप्पट करण्याच्या बाहण्याने आरोपींनी एका बंद खोलीत पूजापाठ केली. पूजा झाल्यावर आरोपीने चौधरी यांना एक पेढा खायला दिला. यानंतर काही वेळातच चौधरी बेशुद्ध झाले. यानंतर आरोपी भोंदुबाबा, शिवकुमार यादव व इतरांनी पैसे घेऊन फरार झाले. चौधरी यांना जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे समजले. त्यांचे सर्व पैसे आरोपींनी लुटून नेले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
संबंधित बातम्या