मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kala Chowki Fire : मोठी बातमी! मुंबईत काळाचौकी परिसरातील महापालिका शाळेत सिलिंडरचे भीषण स्फोट

Kala Chowki Fire : मोठी बातमी! मुंबईत काळाचौकी परिसरातील महापालिका शाळेत सिलिंडरचे भीषण स्फोट

Jan 15, 2024 10:42 AM IST

Mumbai Kala Chowki Fire : मुंबईतील काळाचौकी मिंट कॉलनी परिसरात असलेल्या साईबाबा पथ संकुल शाळेमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे.

Mumbai Kala Chowki Fire
Mumbai Kala Chowki Fire

Mumbai School Gas Cylinder Blast : मुंबईतील काळाचौकी मिंट कॉलनी परिसरात असलेल्या साईबाबा पथ संकुल शाळेमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. तब्बल ६ सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटांमुळे भीषण आग लागली आहे. आगीचे लोळ दुरुवरून दिसत आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे ४ बंब पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. दरम्यान हे स्फोट कसे झाले याची माहिती अद्याप समजू शकली नाही. दरम्यान, शाळेला सुट्टी संक्रांतीनिमित्त सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली.

धावत येऊन पायलटला घातला गुद्दा! IndiGOच्या फ्लाइटमध्ये गोंधळ; व्हिडिओ व्हायरल

काळाचौकी मिंट कॉलनी परिसरात असलेल्या साईबाबा पथ संकुल शाळेमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. या शाळेत सहा सिलेंडरचे स्फोट झाले. हे स्फोत एवढे भयंकर होते की याचे आवाज दूर पर्यंत आले. स्फोट झाल्यावर शाळेत मोठी आग लागली. आज मकर संक्रांती असल्याने शाळेला सुट्टी होती. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. एकामागून एक असे सहा सिलेंडरचे स्फोट झाले.

India Maldives Tension: १५ मार्चपर्यंत सैनिकांना माघारी बोलवा; मालदीवचा भारताला अल्टिमेटम

या शाळेत लग्नकार्याचा हॉल आहे. या ठिकाणी कैटरींगचा देखील व्यवसाय चालतो. या ठिकाणी जेवण तयार करण्याचे काम सुरू होते. या साठी येथे सिलेंडर देखील ठेवण्यात आले होते. दरम्यान, याच सिलेंडरचा स्फोट झाला असावा अशी प्राथमिक माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या काही गाड्या घटनास्थळी गेल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. ही आग भीषण असल्याने बचाव कार्यात अडथळे येत असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने आगीतून बचावासाठी नागरिक घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत जीवित हाणी झाली नाही. 

या संदर्भात माहिती देतांना स्थानिक आमदार अजय चौधरी म्हणाले,  'कोविड काळातील सिलिंडर, ऑक्सिजनचे सिलिंडरचे शाळेत गोडाऊन बनवलं होतं. त्यामुळे एका सिलिंडरचा स्फोट झाला. एका सिलिंडरच्या स्फोटामुळे इतर सिलिंडरचे स्फोट झाले.' 

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर