Jalna-Mumbai Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येतून देशाला सहा वंदे भारत ट्रेनची भेट दिली. आज महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत मिळाली. आज मुंबई ते जालना वंदे भारतचे लोकार्पण करण्यात आले. या ट्रेनमुळे मुंबईतून संभाजीनगरला पोहोचणे केवळ पाच तासाच शक्य होणार आहे.
मराठवाड्याला पहिलीच वंदे भारत एक्स्प्रेस आज मिळाली आहे. वंदे भारत ट्रेनचे तिकीटदर निश्चित झाले नाहीत. मात्र हे दर मुंबई सोलापूर वंदे भारत इतके म्हणजे ९०० ते १२०० रुपयांच्या आसपास राहणार असण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमुळं मुंबई ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास जवळपास साडेपाच तासांत पूर्ण होणार आहे.
मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १ जानेवारी पासून बुधवार वगळता प्रतिदिन दुपारी १ वाजून १० मिनिटांनी सुटेल व त्याचदिवशी रात्री साडे आठ वाजता जालन्यात पोहोचेल. २ जानेवारी २०२४ पासून जालन्याहून सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी गाडी सुटेल व त्याच दिवशी ११ वाजून ५५ मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ---/१३.१० वाजता
दादर - १३.१७ वाजता / १३.१९ वाजता
ठाणे - १३.४० वाजता/१३.४२ वाजता
कल्याण जंक्शन - १४.०४ वाजता / 1४.०६ वाजता
नाशिक रोड - १६.२८ वाजता/१६.३० वाजता
मनमाड जंक्शन - १७.३० वाजता / १७.३२ वाजता
औरंगाबाद - १९.०८ वाजता / १९.१० वाजता
जालना - ---/२०.३० वाजता
संबंधित बातम्या