Mumbai News: मुंबईतील कांदिवली पूर्व येथे महिलांसाठी पहिल्यांदाच फिरते स्थानगृह तयार करण्यात आले. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सदर स्थानगृहची निर्मिती करण्यात आली. हे स्थानगृह दिवसातून १२ तास सुरू राहिल. या स्थानगृहमध्ये महिलांसाठी अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. या स्थानगृहाला फिरते मोबाईल बाथरूम असे नाव देण्यात आले आहे.
फिरत्या स्थानगृह उद्घाटन करताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की, 'मंगल प्रभात लोढा म्हणाले की, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी स्थानगृहाची समस्या अतिशय त्रासदायक ठरते, हे आम्ही जाणतो. तो त्रास कमी करण्यासाठीच आम्ही जिल्हा नियोजन समितीमार्फत देशातील फिरत्या स्नानगृहाचा पहिला प्रकल्प राबवला आहे. यामुळे स्वच्छ भारत घडवण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे जात आहोत. आमदार अतुल भातखळकर यांनी सदर प्रकल्पासाठी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. सर्वांना मी आवाहन करतो की आपण याचा उपयोग करावा. इतर ठिकाणी सुद्धा आपण सदर प्रकल्प राबवू', असेही ते म्हणाले. तसेच सर्व महिलांना फिरत्या स्नानगृहाचा वापर करण्याचे त्यांनी आवाहन केले.
सर्वांना स्नानगृहाचा वापर करण्याची संधी मिळावी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी या स्नानगृहात महिला कर्मचारीसुद्धा नियुक्त करण्यात येणार आहेत. प्रत्येक महिलेलास्थानासाठी ५ ते १० मिनिटे इतका वेळदिला जाईल. या वेळेनंतर पाणीपुरवठा बंद होईल. या फिरत्या स्थानगृहमुळे गरजू महिलांची समस्या सुटू शकते आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांना व्यवस्थित आंघोळ करता येईल त्याशिवाय परिसर स्वच्छ राहण्यास मदत होऊन ‘स्वच्छ भारत अभियाना’ला देखील हातभार लागेल.
संबंधित बातम्या