Mumbai Accident: ट्रकच्या चाकाखाली येऊन डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, मुंबईतील चिंचपोकळी येथील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Accident: ट्रकच्या चाकाखाली येऊन डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, मुंबईतील चिंचपोकळी येथील घटना

Mumbai Accident: ट्रकच्या चाकाखाली येऊन डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, मुंबईतील चिंचपोकळी येथील घटना

Nov 26, 2024 04:42 PM IST

Mumbai Delivery Boy Accident News: मुंबईतील चिंचपोकळी रेल्वे स्थानकाजवळ ट्रकच्या चाकाखाली येऊन डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला.

 ट्रकच्या चाकाखाली येऊन डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
ट्रकच्या चाकाखाली येऊन डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

Mumbai Accident News: मुंबईतील चिंचपोकळी रेल्वे स्थानकाजवळील संत ज्ञानेश्वर पुलावर ट्रकच्या चाकाखाली येऊन डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (२५ नोव्हेंबर २०२४) दुपारी २.१५ च्या सुमारास घडली. याप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

शंकरप्पा असे मृत्यू झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव असून तो धारावी येथील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी शंकरप्पा हा इडलीची डिलिव्हरी देण्यासाठी ॲक्टिव्हा स्कूटरवरून चिंचपोकळी पुलावरून लालबागच्या दिशेने जात एका वळणावर त्याचा तोल गेला आणि ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रक चालकाने मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर रात्री उशीरा त्याने स्वत:ला काळाचौकी पोलिसांच्या स्वाधीन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, धम्म प्रसाद (वय, ५०) असे अटक झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. प्रसाद हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून गेल्या ३५ वर्षांपासून मुंबईत काम करतो. अपघाताच्या वेळी तो रिकामा ट्रक दारूखान्याच्या दिशेने चालवत होता. या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

देशात गेल्यावर्षी जवळपास २ लाख लोकांचा मृत्यू

देशात गेल्यावर्षी १ लाख ७० हजारांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर, ४ लाख ६३ हजार लोक जखमी झाले आहेत. २०२२ च्या तुलनेत ही संख्या ४ टक्क्यांनी वाढली आहे. देशात दर तीन मिनिटाला एकाचा रस्ते अपघातात मृत्यू होत आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रासह एकूण २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये वाढ रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे, यात उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम आणि तेलंगणा यांसारख्या राज्याचा समावेश आहे.

देशात सर्वाधिक मृत्युची नोंद कुठे?

देशात सर्वाधिक अपघाती मृत्युंची नोंद तामिळनाडूत (१८ हजार ३४७) करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात २०२३ मध्ये १५ हजार ३६६ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. तर, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये अनुक्रमे १३ हजार ७९८ आणि १२ हजार ३२१ हजार मृत्युची नोंद झाली. तामिळनाडूत जखमींची (७२ हजार २९२) संख्या मोठी आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर