मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संतापजनक.. कुर्ल्यात घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार, VIDEO बनवत गुप्तांगावर दिले सिगारेटचे चटके

संतापजनक.. कुर्ल्यात घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार, VIDEO बनवत गुप्तांगावर दिले सिगारेटचे चटके

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 04, 2022 09:23 PM IST

मुंबईतील कुर्ला येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपींनी बलात्काराची व्हिडिओ बनवून पीडितेला तो व्हायरल करण्याची धमकीही दिली होती.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

मुंबई – राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील कुर्ला येथे तीन जणांनी एका महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची व याचा व्हिडिओ बनवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कळस म्हणजे या नराधमांनी बलात्कार केल्यानंतर पीडितेच्या गुप्तांगावर पेटत्या सिगारेटने चटके दिले. या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. यामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ही घटना बुधवारी घडली असून ४२ वर्षीय महिलेवर तीन व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केला आहे. नराधमांनी पीडितेवर धारधार शस्त्रांनी हल्ला करण्याबरोबरच तिच्या गुप्तांगावर सिगारेटचे चटकेही दिले आहेत. मुंबई पोलिसांनी आज (रविवार) या धक्कादायक घटनेबाबत माहिती दिली.

पोलिसांनी सांगितले की, पीडिता आणि आरोपी कुर्ला परिसरातच राहतात. पीडितेसोबत नराधमांनी अनैसर्गिक अत्याचार देखील केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी सांगितले की, बलात्कारानंतर आरोपींनी महिलेच्या गुप्तांगावर सिगारेटचे चटके दिले. आरोपीमधील एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ बनवला असून याची पोलिसात तक्रार दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी पीडितेला दिली होती.

पीडितेने ही घटना शेजाऱ्यांना सांगितली व त्यानंतर एका स्वंयसेवी संस्थेला याची माहिती दिली. त्यानंतर एनजीओमार्फत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी ३७६, ३७६ डी, ३७७ व ३२४ कलमांतर्गत गुन्हा नोंद केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या