मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, १४ जणांचा मृत्यू

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, १४ जणांचा मृत्यू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 14, 2024 08:14 AM IST

Ghatkopar Hording collapse : घाटकोपरमध्ये (Ghatkopar) छेडानगर येथे एका पेट्रोल पंपावर १२० फुटांचे महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा ८ वरुण १४ वर पोहोचला आहे. अजूनही बचाव कार्य सुरू आहे.

घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा ८ वरुण १४ वर पोहोचला आहे.
घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा ८ वरुण १४ वर पोहोचला आहे.

Ghatkopar Hording collapse : मुंबईमध्ये सोमवारी पावसाने आणि वादळी वाऱ्याने भीषण थैमान घातले. या वादळी वाऱ्याचा मोठा फटका मुंबईकरांना बसला. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग कोसळले. या घटनेत सोमवार पर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, या दुर्दैवी घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. मृतांची संख्या ही १४ वर पोहोचलि आहे. या ठिकाणी अजूनही बचावकार्य सुरू आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon update : बळिराजासाठी खुशखबरी! मान्सूनबाबत हवामान खात्याची मोठी अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला होणार आगमन

होर्डिंग खाली तब्बल १०० जण अडकले होते. आता पर्यंत या घटनेत जखमींचा आकडा हा ६० वरुण ८७ वर पोहोचला आहे. सर्व जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालय, एच बी टी रूग्णालय, एम जे फुले रुग्णालय आणि प्रकृती रुग्णालयात दाखल केले आहे. या जखमींपैकी १४ जणांचा मृत्यू तर ४२ जणांवर उपचार सुरू आहेत. ३१ नागरिकांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान या घटनेत घटनेच्या उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे.

पाकिस्तानच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये चॅटिंग घातपाताचे प्लॅनिंग करणाऱ्या नांदेडमधील युवकाला गुजरात पोलिसांनी केली अटक

सोमवारी अवकाळी पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले. धुळीचे वादळ, पाऊस, आणि गारपीटमुळे मोठे नुकसान झाले. तर वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर मोठे लोखंडी होर्डिग कोसळले. या वेळी पावसापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक या पेट्रोल पंपावर थांबले होते. तब्बल १०० पेक्षा जास्त नागरिक त्या खाली अडकले होते. या घटनेनंतर एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी रवाना करण्यात आली. तसेच स्थानिक अग्निशामक दल आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. लोखंडी होर्डिगअसल्याने ते हटवण्यास मोठा कालावधी लागला. दरम्यान, यामुळे मृतांचा आकडा देखील वाढला.

या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. ही घटना घटना दुर्दैवी असून महापालिकेची यंत्रणा व राज्याची डिझास्टर टीम पथक बचाव कार्य राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. या सोबतच मुंबईतल्या सगळ्या होर्डिंगचं स्पेशल ऑडिट करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. तर परवाना नसलेली होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहे.

घाटकोपरमधील एनडीआरएफ बचाव कार्य राबवत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, 'बिल्डरचे मोठे होर्डिंग पडले तेव्हा मी तिथे होतो. तेथे उपस्थित असलेल्या सर्व कार, दुचाकी आणि लोक त्यात अडकले. आम्ही लोकांना बाहेर पडण्यास मदत केली आणि त्यांना कसेतरी वाचवले.

एनडीआरएफ अधिकारी गौरव चौहान यांनी एएनआयला सांगितले की, 'संध्याकाळी ५ वाजता घटनेची माहिती मिळाली. पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग पडले होते. सुमारे ६५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. एडीआरएफने तीन जणांची सुटका केली असून ढिगाऱ्याखाली दबलेले चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 'आम्ही लोखंडी मलबा हटवण्यासाठी क्रेनचा वापर करत आहोत.

फलक मालक भावेश भिडे आणि इतरांविरुद्ध गुन्हा

मुंबई पोलिसांनी फलक मालक भावेश भिडे आणि इतरांविरुद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम 305, 338, 337 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपाध्यक्ष जगदीप धनखर यांच्यासह अनेकांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग