Mumbai Hit And Run Case : मुंबईत वरळी येथे हीट अँड रनची घटना नुकतीच घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्यासह देशात खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतांना आता मुंबईत आणखी एक हीट अँड रनचा प्रकार पुढे आला आहे. मुलुंड येथे एका ऑडी कारने दोन रिक्षाचालकांना जोरदार धडक दिली असून या घटनेत दोन्ही रिक्षांचा चक्काचूर झाला आहे. तर रिक्षाचे चालक व त्यातील प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. यातील एका रिक्षाचालकाची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे. आरोपीने घटनास्थळी न थांबता पळ काढला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी व कारचा शोध पोलिस घेत आहेत.
मुंबईत वरळी येथे शिवसेना पदाधीकाऱ्याच्या मुलाने त्याच्या आलीशान कारने काही दिवसांपूर्वी सकाळी दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला धडक दिली होती. ही घटना ताजी असतांना मुलुंडमध्ये आज सकाळी आणखी एक हीट अँड रन ची घटना घडली. एका भरधाव ऑडी कारने दोन रिक्षाचालकांना जोरदार धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत दोन्ही रिक्षांचा चक्काचूर झाला आहे. तर रिक्षा चालक आणि प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. मुलुंड पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेत एका रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
वरळी येथे काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या एका उपनेत्याच्या मुलाने दारूच्या नेशत गाडी चालवत दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्याला जोरदार धडक दिली होती. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला होता. घनतेनंतर आरोपी हा फरार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याचे वडील व त्याला अटक केली आहे.
पुण्यात हीट अँड रनच्या घटना वाढत चालल्या आहेत. पुण्यातील पोर्शे प्रकरण ताजे असतांना एका माजी नगर सेवकाच्या मुलाने भरधाव गाडी चालवत टेम्पोला धडक दिली होती. या घटना ताज्या असतांना आता आणखी एक प्रकरण पुढे आले आहे. पिंपरी गावात एका भरधाव कारने रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला जोरदार धडक देऊन पळ काढला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे.
संबंधित बातम्या