Ramdev Baba news : मुंबई उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद लिमिटेडला मोठा दणका दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेडने दाखल केलेल्या ट्रेडमार्क उल्लंघन केल्या प्रकरणी पतंजलीच्या कापूर उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. २०२३ मध्ये दिलेल्या या आदेशाचे उल्लंघन केल्याने उच्च न्यायालयाने ही कारवाई केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी कोर्टाच्या २०२३ च्या अंतरिम आदेशाचे उल्लंघन केले. या बाबत न्यायमूर्ती आर. आय. छागला यांच्या एकल खंडपीठाने पतंजलीने जाणूनबुजून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने दंड ठोठावला. तसेच ही रक्कम दोन आठवड्यात जमा करण्याचे आदेश देखील दील आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने कंपनीला ५० लाख रुपये जमा करण्याचेही आदेश दिले आहेत.
न्यायमूर्तींनी मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेडने दाखल केलेली याचिका खंडपीठाने निकाली काढली. यामध्ये न्यायालयाच्या बंदीनंतरही कापूर उत्पादने विकल्याबद्दल पतंजलीवर अवमानाची कारवाई करण्याची विनंती केली होती. मंगलम ऑरगॅनिक्सने नंतर अर्ज दाखल करत पतंजली अंतरिम आदेशाचे उल्लंघन करून कापूर उत्पादने विकत असल्याचा आरोप केला होता. यावर निकाल देत न्यायलयाने हा दंड ठोठावला आहे.
पतंजली आयुर्वेद लिमिटेड ही देशातील मोठी कंपनी आहे. सुप्रसिद्ध कंपनी आहे. कंपनी आयुर्वेदिक उत्पादनांच्या निर्मिती आणि विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. ही कंपनी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी स्थापन केली होती.
योगगुरू बाबा रामदेव यांना पुन्हा एकदा न्यायालयाकडून धक्का बसला आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना सोशल मीडियावरील दावा मागे घेण्यास सांगितले आहे. ज्यामध्ये 'कोरोनिल' हा कोरोनावरील उपाय म्हणून प्रचार केला गेला होता. यासोबतच ॲलोपॅथीच्या परिणामाबाबत देखील त्यांनी खोटा दावा केला होता. न्यायालयाने त्यांना १५ दिवसांच्या आत हा दावा मागे घेण्यास संगितले आहे.
न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांच्या खंडपीठाने निर्णय देताना सांगितले की, 'या प्रकरणी अर्ज मंजूर करत असून मी काही मजकूर, पोस्ट काढून टाकण्यास सांगितले होते. मी बचाव पक्षाला तीन दिवसांत ते काढून टाकण्यास सांगितले आहेत न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांनी पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर २१ मे रोजी निर्णय राखून ठेवला होता. दिल्ली मेडिकल असोसिएशनने (डीएमए) दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. याचिकेत असे म्हटले होते की, रामदेव यांच्या कंपनीने कोरोनिल किटबद्दल खोटे दावे केले आणि त्याचे वर्णन कोरोना रोगावर उपचार करणारे आहे, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून परवाना देण्यात आला होता.
संबंधित बातम्या