मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पालकांच्या असहमतीनंतर लग्नास नकार देणे म्हणजे बलात्कार नाही; हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची टिप्पणी

पालकांच्या असहमतीनंतर लग्नास नकार देणे म्हणजे बलात्कार नाही; हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची टिप्पणी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 03, 2024 09:50 AM IST

high court nagpur bench : घरच्यांना मान्य नसल्यामुळे जर एखाद्या पुरुषाने एखाद्या महिलेशी लग्न करण्याचे वचन मोडले तर तो बलात्काराचा गुन्हा ठारत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

bombay high court judgement
bombay high court judgement (HT_PRINT)

high court nagpur bench : घरच्यांना मान्य नसल्यामुळे जर एखाद्या पुरुषाने महिलेशी लग्न करण्यास नकार दिला, तर तर तो बलात्काराचा गुन्हा घडत नाही, अशी टिप्पणी देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका ३१ वर्षीय व्यक्तीला त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले. लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी या व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Pune University : रामायणातील पात्र आक्षेपार्ह दाखवल्यावरुन पुणे विद्यापीठात ‘अभविप’ चा राडा; नाटक पाडले बंद

न्यायमूर्ती एम. डब्ल्यू चांदवानी यांच्या खंडपीठाने ३० जानेवारी रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, एका व्यक्तीने लग्नाचे वचन मोडले आहे. त्याने महिलेला तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी लग्नाचे वचन दिले नव्हते. खोटे आश्वासन न पाळणे आणि वचन न मोडणे यात फरक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. २०१९ मध्ये एका ३३ वर्षीय महिलेने नागपूर पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये तिने २०१६ पासून त्या व्यक्तीसोबत संबंध ठेवल्याचा दावा केला होता. लग्नाचे आश्वासन देऊन त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

Kalyan Crime News:कल्याणमध्ये भाजप व शिंदे गटात राडा! भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा महेश गायकवाडवर पोलिस ठण्यातच गोळीबार

दरम्यान, त्याच्या घरच्यांनी विरोध केल्याने त्याने दुसऱ्याशी लग्न केले. ही बाब समजल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणात दोषमुक्तीची मागणी करणाऱ्या याचिकेत त्या व्यक्तीने सांगितले की, महिलेशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, तिने हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि आपण दुसऱ्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले. या व्यक्तीच्या कुटुंबीयांनीही हे नाते स्वीकारण्यास नकार दिल्याचे याचिकेत म्हटले आहे. यानंतर तो दुसऱ्या महिलेशी लग्न करण्यास तयार झाला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदाराने २०२१ मध्ये दुसरे लग्न केले होते.

न्यायालयाने सांगितले की तक्रारदार महिला ही प्रौढ आहे. दरम्यान, आरोपीने पुरुषाने तिच्याशी लग्न करण्याचे वचन खोटे दिले आहे हे सिद्ध होत नाही . कोर्टाने म्हटले आहे की संबंधाच्या सुरुवातीपासून पुरुषाचा महिलेशी लग्न करण्याचा कोणताही हेतू नव्हता. आणि त्याने केवळ शारीरिक संबंध ठेवण्यासाठी लग्न करण्याचे खोटे आश्वासन दिले होते, हे सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नाही. त्याने दिलेले आश्वासन खोटे आहे हे सिद्ध होत नाही. त्याने लग्न करण्यास नकार दिला कारण त्याचे पालक त्यांच्या लग्नास सहमत नव्हते. यामुळे याचिकाकर्त्याने बलात्काराचा गुन्हा केला आहे, असे म्हणता येणार नाही.

WhatsApp channel