Bombay High Court : औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरावर मोठी अपडेट; हायकोर्टाचा मोठा निर्णय
aurangabad osmanabad rename : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर हायकोर्टाने मोठा निर्णय घेतला. त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का बसला आहे.
aurangabad and osmanabad rename : शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या नामांतराबातचा निर्णय घेतला. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने नामांतराला संमती दिली आहे. परंतु आता मुंबई उच्च न्यायालयातून नामांतराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांची नावं महसूल क्षेत्रात (जिल्हा आणि तालुका पातळीवर) औरंगाबाद आणि उस्मानाबाद अशीच नाव राहणार असल्याचा निकाल हायकोर्टाने दिला आहे. त्यामुळं आता जिल्ह्यांची नव्हे तर केवळ शहरांचंच नामांतर झाल्याचं हायकोर्टाच्या निकालातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळं आता यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर झाल्यानंतर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहचलं. त्यावेळी जिल्ह्यांचं नाही तर केवळ शहराचंच नामांतर करण्यात आल्याचा दावा शिंदे-फडणवीस सरकारने कोर्टात केला. परंतु त्यावर सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय न घेण्यात आल्यामुळं हायकोर्टाने आपला निकाल सुनावला आहे. हायकोर्टाने नामांतराला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका आज निकाली काढल्या आहे. त्यामुळं आता नामांतर केवळ शहरांपुरतंच होणार असल्याचं सिद्ध झालं आहे. परंतु आता राज्य सरकारने याचिकांच्या वैधतेवर आक्षेप घेतला असून निर्णय बदलण्याचे संकेत दिले आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या नामांतराचे आदेश निघतील, त्यावेळी याचिकाकर्त्यांना नव्याने याचिका दाखल करण्याची मूभा हायकोर्टाने दिली आहे. याशिवाय सुनावणी सुरू असताना सध्या तालुका आणि जिल्हा पातळीवर जुनंच नाव वापरण्यात येणार असल्याचं राज्य सरकारकडून कोर्टात सांगण्यात आलं आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी येत्या चार ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
विभाग