मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला मोठा झटका; फॅक्ट चेकसंदर्भातील IT नियमांमधील २०२३ च्या दुरुस्त्या रद्द-mumbai high court cancels 2023 amendments in it rules fact check big blow central govt ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला मोठा झटका; फॅक्ट चेकसंदर्भातील IT नियमांमधील २०२३ च्या दुरुस्त्या रद्द

मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला मोठा झटका; फॅक्ट चेकसंदर्भातील IT नियमांमधील २०२३ च्या दुरुस्त्या रद्द

Sep 20, 2024 08:48 PM IST

Mumbai high court : आयटी नियमातील बदलांमुळे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले असल्याचे म्हणत मुंबई हायकोर्टाने फॅक्ट चेक संदर्भातील IT नियमांमधील २०२३ च्या दुरुस्त्या रद्द केल्या आहेत.

मुंबई हायकोर्ट
मुंबई हायकोर्ट

मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला मोठा धक्का देत आयटी नियमांमधील  २०२३ च्या दुरुस्त्या रद्द केल्या आहेत. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठाने आपल्या निकालात म्हटले की, या सुधारणा भारतीय राज्यघटनेच्या कलम १४  आणि कलम १९ चे उल्लंघन करतात. जानेवारी २०२४ मध्ये न्यायमूर्ती गौतम पटेल आणि डॉ नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्वतंत्र निकाल दिल्यानंतर हे प्रकरण टायब्रेकर न्यायाधीशांकडे आले होते. न्यायमूर्ती चांदूरकर म्हणाले की,  सुधारणा कलम २१ चे उल्लंघन करतात.

मुंबई उच्च न्यायालयाने २०२३ मध्ये करण्यात आलेल्या आयटी नियमांमधील सुधारणा रद्द बातल ठरवल्या. या बदलांमुळे केंद्र सरकारला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आपल्या प्रकरणांबद्दल खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती रोखण्यासाठी युनिट स्थापन करण्याचा अधिकार मिळाला. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी निकाल देताना उच्च न्यायालयात सांगितले की, मी या प्रकरणाचा सविस्तर विचार केला आहे. या बदलांमुळे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले आहे.  बदल करण्यासाठी वापरण्यात आलेले खोटे, दिशाभूल करणारे आणि चुकीचे स्पष्टीकरण योग्य प्रकारे दिले गेले नाही. त्यामुळे हे राज्यघटनेच्या कलम १९ आणि १९ (१) चे उल्लंघन करते. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांनी जानेवारी महिन्यात दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने विभक्त निकाल दिल्यानंतर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

२०२३ मध्ये केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचार संहिता) नियम, २०२१ (IT नियम 2021) मध्ये सुधारणा केली होती. परंतु नियम ३, जो केंद्राला खोट्या ऑनलाइन बातम्या ओळखण्यासाठी FCU तयार करण्याचा अधिकार देतो, त्याला कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागला आहे.

जानेवारीत निकाल देताना न्यायमूर्ती पटेल यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन होत असल्याचे कारण देत हे बदल रद्द केले, तर न्यायमूर्ती गोखले यांनी त्यांची वैधता कायम ठेवली. 

वास्तविक, केंद्र सरकारने २०२३ मध्ये आयटी नियमांमध्ये सुधारणा केली. याअंतर्गत सोशल मीडियावर सरकारविरोधात खोटी,  भ्रामक आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवणारी कोणतीही पोस्ट आढळल्यास ती चिन्हांकित करून मध्यस्थाला (सोशल मीडिया प्लॅटफॉर्म) कळवू शकते. सरकारकडून कळविल्यानंतर लवादाला त्याला हटवावे लागते, जर त्याने त्याला हटविण्यास नकार दिला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

कॉमेडियन कामरा तसेच अन्य अनेकांनी दाखल केली होती  याचिका -

कॉमेडियन कुणाल कामरा, एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि इतर मीडिया हाऊसेससह अनेकांनी या वादग्रस्त नियमाला आव्हान दिले होते. आपल्या याचिकेत त्यांनी म्हटले होते की, सरकारला विचारांवर जास्त निर्बंध लादायचे आहेत. कामरा म्हणाले की, या बदलांमध्ये स्पष्ट केलेले शब्द अतिशय अस्पष्ट आहेत आणि यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विपरीत परिणाम होतो. सरकारकडून कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून मॉडरेटर्स मजकूर काढून टाकतील, असे ते म्हणाले.

केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या सुधारणांचा बचाव करताना म्हटले की, या सुधारणांचा उद्देश टीका किंवा व्यंग्य रोखणे नसून खोट्या माहितीचा प्रसार रोखणे हा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतर मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच त्याला स्थगिती दिली आहे.

Whats_app_banner
विभाग