मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ST Bus Accident : मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस-रिक्षाचा भीषण अपघात; ३ प्रवासी जागीच ठार

ST Bus Accident : मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस-रिक्षाचा भीषण अपघात; ३ प्रवासी जागीच ठार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 07, 2024 03:44 PM IST

St Bus Accident : रायगडमध्ये शिवशाही बस व ऑटो रिक्षाचा भीषण अपघात झाला असून यामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर काही प्रवासी जखमी झाले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस-रिक्षाचा भीषण अपघात
मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस-रिक्षाचा भीषण अपघात

मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai goa highway)  रायगड जिल्ह्यात बस व रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात माणगाव नजीक तिलोरे गावाजवळ झाला. एसटीच्या धडकेत रिक्षामधील (st bus and auto accident)  तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. 

ट्रेंडिंग न्यूज

या अपघातामध्ये रिक्षात असलेल्या तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. दत्तात्रय वरणदेकर, प्रवीण मालसुरे अशी मृतांची नावे आहेत. एका मृताची ओळख पटलेली नाही.

रायगड जिल्ह्यात रिक्षा आणि शिवशाही बसचा झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. शिवशाही बस ठाणे येथून दापोलीला जात होता. ही बस माणगावमध्ये आली असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात  इतका भीषण होता की अपघातग्रस्त रिक्षाचा पार चुराडा झाला आहे तर बसच्या समोरील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगाव शहरातील मानस हॉटेल समोर आली असता रिक्षा आणि या बसमध्ये अपघात झाला. दरम्यान अपघाताचे कारण समोर आलेले नाही.

रात्रीचे जेवण करून फिरायला गेलेल्या दोघांना कारनं उडवलं -

का भरधाव कारने पाठीमागून येत दोघांना उडवले. यात गंभीर जखमी झाल्याने एकाचा मृत्यू झाला तर दूसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पुण्यातील शिवणे येथील कोंढवा गेट येथे गुरुवारी रात्री घडली. ही घटना सिसिटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून यात एक भरधाव कार दोघांना पाठीमागून धडक देतांना दिसत आहे.

मनिष नवनाथ तावरे (वय १७) व अजिंक्य केदार पाटील (वय १७) अशी कारने उडवलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही कोंढवे धावडे येथील राहणारे आहेत. यातील अजिंक्य पाटील याचा मृत्यू झाला आहे. तर मनीष तावरे हा जखमी झाला आहे. या प्रकरणी आरोपी अजिंक्य अरुण आघाडे (वय ३६) या कार चालकाला अटक करण्यात आली आहे.

IPL_Entry_Point

विभाग