Mumbai Goa Highway mega block : मुंबई - गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या महामार्गावर पुलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेतला आहे. यासाठी पुढील दोन दिवस या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधित प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे अवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai goa highway) पुन्हा २ दिवस म्हणजे गुरुवार व शुक्रवारी चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कोलाड येथील पुई म्हैसदरा नदीवर पुलाचा गर्डर बसविण्यासाठी महामार्ग बंद राहणार आहे.
मुंबई गोवा महामार्गावर याआधी १३ ते १५ जुलैपर्यत तीन दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा या महामार्गावरील पुईं येथील म्हैसदरा पुलाच्या कामासाठी उद्यापासून वाहतूक ही दिवसातून चार तास बंद राहणार आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं गेलं आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पुढील दोन दिवस चार तास बंद राहणार आहे. मुंबई -गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील पुई म्हैसदरा पुलाचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलं गेलं होतं. मात्र आता या कामाने वेग घेतला आहे. या पुलावरील लोखंडी गर्डर बसविण्याकरिता महामार्ग गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारी बारा ते चार या वेळेत एकूण चार तास बंद राहणार आहे. मात्र गर्डर टाकण्याचे काम दिवसा करण्याऐवजी रात्री करण्याचे आवाहन प्रवाशांनी केलं आहे. रात्री महामार्गावर वर्दळ कमी असते.
मुंबईहून कोकणाकडे पाली माणगावमार्ग जावे लागणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत पर्यायी वाहतुकीसाठी कोकणाकडून मुंबईकडे यायचं असल्यास माणगाव-निजामपूर-पाली-खोपोली, रोहा नागोठाणे असा प्रवास करावा लागणार आहे. तर मुंबईकडून गोव्याकडे यायचं झाल्यास वाकन पाली-निजामपूर-माणगावमार्गे प्रवास करावा लागणार आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मध्यरात्री १ च्या सुमारास वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला आहे. डोंबिवली येथून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची ट्रॅव्हल बस ट्रॅक्टरला जोरदार धडकली असून या भीषण अपघात पाच जण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी झाले आहेत.
संबंधित बातम्या