Mumbai Goa Highway : यंदाही कोकणवासीयांचा प्रवास खड्ड्यातूनच! मुंबई-गोवा महामार्ग पूर्तीसाठी नवी डेडलाइन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Goa Highway : यंदाही कोकणवासीयांचा प्रवास खड्ड्यातूनच! मुंबई-गोवा महामार्ग पूर्तीसाठी नवी डेडलाइन

Mumbai Goa Highway : यंदाही कोकणवासीयांचा प्रवास खड्ड्यातूनच! मुंबई-गोवा महामार्ग पूर्तीसाठी नवी डेडलाइन

Jan 03, 2024 08:34 PM IST

Mumbai Goa Highway New Deadline : वर्ष २०११ मध्ये पूर्ण होणारा प्रकल्प २०२३ मध्येही अपूर्ण राहिला आहे. आता सरकारने मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी नवीन डेडलाईन दिली आहे.

Mumbai goa Expressway
Mumbai goa Expressway

Mumbai Goa Expressway latest News : मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार याची नवी डेडलाईन समोर आली आहे. त्यानुसार कोकणवासीयांचा या मार्गावरून यंदाचा प्रवासही खड्ड्यातूनच होणार आहे.  मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी नवीन डेडलाईन सरकारने दिली आहे. आता, ३१ डिसेंबर २०२४ ही नवीन डेडलाईन सरकारने ठरवली आहे.  आधीची डेडलाईन ३१ डिसेंबर २०२३ होती. मात्र या कालावधीत महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. 

मुंबई गोवा महामार्गावरील दुरावस्थेबाबत हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर आज सुनावणी झाली. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाबाबत हायकोर्टात सुनावणी दरम्यान सरकारने नवी डेडलाईन जाहीर केली आहे. प्रकल्पाला होणाऱ्या विलंबामुळे वाढणारा खर्च हा जनतेचाच पैसा असल्याची टिप्पणी हायकोर्टाने सुनावणी दरम्यान केली.  

 यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदाही त्रासदायक प्रवासाचा सामना करावा लागणार आहे. डिसेंबर २०२३ चा मुहूर्त हुकल्याची कबुली राज्य सरकारने प्रशासनाने कोर्टात दिली. त्यानंतर राज्य शासनाच्या बांधकाम विभागाच्या कामकाजावर कोर्टानेही नाराजी व्यक्ती केली आहे. वर्ष २०११ मध्ये पूर्ण होणारा प्रकल्प २०२३ मध्येही अपूर्ण राहिला आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर