Mumbai Suicide: त्यानं मला दोनदा प्रेग्नंट केलं आणि...; प्रियकराच्या छळाला कंटाळून मुंबईतील तरुणीची आत्महत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Suicide: त्यानं मला दोनदा प्रेग्नंट केलं आणि...; प्रियकराच्या छळाला कंटाळून मुंबईतील तरुणीची आत्महत्या

Mumbai Suicide: त्यानं मला दोनदा प्रेग्नंट केलं आणि...; प्रियकराच्या छळाला कंटाळून मुंबईतील तरुणीची आत्महत्या

Ashwjeet Jagtap HT Marathi
Updated Feb 07, 2025 04:14 PM IST

Mumbai Girl Dies by Suicide: मुंबईतील माहीम परिसरात राहणाऱ्या तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

मुंबईतील माहीम येथील तरुणीची गळफास लावून आत्महत्या
मुंबईतील माहीम येथील तरुणीची गळफास लावून आत्महत्या

Mumbai Girl Suicide News: मुंबईतील माहिम परिसरात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. हे टोकाचे पाऊल उचलण्याआधी तरुणीने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यात तिने आत्महत्येस प्रियकराला जबाबदार धरले. यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील माहीम परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीने व्हिडिओ बनवत आपल्या प्रियकरावर गंभीर आरोप केले आहेत. तरुणीच्या प्रियकराने तिला दोनवेळा गर्भवती केले. परंतु, नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यामुळे तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराविरोधात बीएनएस कलम १०८ - आत्महत्येस प्रवृत्त करणे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

मृत तरुणी भाड्याच्या खोलीत राहत होती. तिने आत्महत्या केल्याची माहिती तिच्या घरमालकाने पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गुरुवारी दुपारी ४.१५ मिनिटांनी ही घटना उघडकीस आली. ओवैस शेख असे तरुणीच्या प्रियकराचे नाव असून त्यानेच संबंधित तिने आत्महत्या केल्याची घरमालकाला माहिती दिली. यानंतर घराचा मालक आणि ओवैस शेख यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी तरुणी छतावरील लोखंडी पाईपला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

यानंतर ओवैस शेखने एका मित्राच्या मदतीने तिला खाली उतरवून सायन रुग्णालयात नेले. परंतु, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत मुलीच्या मैत्रिणीने सांगितले की, आरोपी ओवैस शेख हा तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता आणि तिच्याशी लग्न करण्यास नकार देत होता. यातूनच तरुणीने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला. माहीम पोलिसांनी ओवैस अब्दुल रहमान शेखविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ११७ (२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू आहे.

Ashwjeet Jagtap

TwittereMail

अश्वजीत जगताप हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये सीनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहे. अश्लजीत येथे राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स, टेक्नोलॉजी, ऑटो, व्हायरल न्यूज आणि करिअर संबंधित बातम्या लिहितो. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात एकूण ५ वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी लेटेस्टली- मराठी (डिजिटल), एबीपी माझा (डिजिटल) मध्ये कामाचा अनुभव. अश्वजीतला क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळणे आणि बायोपिक चित्रपट पाहायला आवडतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर