मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 16, 2024 01:07 PM IST

Mumbai Ghatkopar Hording : तब्बल ६३ तासांनी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य संपले आहे. गॅस कटर, जेसीबीच्या साह्याने लोखंडी ढीगारा उपसण्यात आला. या घटनेत १६ नागरिक ठार झाले आहेत.

तब्बल ६३ तासांनी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य संपले आहे. गॅस कटर, जेसीबीच्या साह्याने लोखंडी ढीगारा उपसण्यात आला. या घटनेत १६ नागरिक ठार झाले आहेत.
तब्बल ६३ तासांनी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य संपले आहे. गॅस कटर, जेसीबीच्या साह्याने लोखंडी ढीगारा उपसण्यात आला. या घटनेत १६ नागरिक ठार झाले आहेत.

Ghatkopar Hoarding case : मुंबईमध्ये सोमवारी पावसाने आणि वादळी वाऱ्याने भीषण थैमान घातले. या वादळी वाऱ्याचा मोठा फटका मुंबईकरांना बसला. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग कोसळले होते. एनडीआरएफ, अग्निशामक दल, महानगर पालिकेची यंत्रेना गेल्या ६३ तासांपासून बचाव कार्य राबाबत होते. हे बचाव कार्य ६३ तासांनंतर थांबवण्यात आले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थाळाची शेवटची पाहाणी करत हे बाचवकार्य संपल्याची घोषणा केली. या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ जण जखमी झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Anita Goyal death : जेट एअरवेजचे प्रमुख नरेश गोयल यांच्या पत्नीचं कॅन्सरनं निधन, काही दिवसांपूर्वीच मिळाला होता जामीन

घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्यावर मोठ्या प्रमाणात बचाव कार्य राबवण्यात आले. हे बचाव कार्य ६३ तास अविरत सुरू राहिले. या घटनेत १६ नागरिक ठार तर ७५ जण जखमी झाले आहेत. आज सकाळी मनोज चांसोरिया (वय ६०), अनिता चान्सोरिया (वय ५९) यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दुर्घटनास्थळी लोखंडी ढिगारा होता. या खाली दबलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी घटनास्थळी ७५ कर्मचाऱ्यांसह २५ वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी तैनात आहेत. १० जेसीबी, १० ट्रक, ५ पोकलेन, २ गॅस कटर्स टीम, २ हायड्रोलिक क्रेन, मेट्रो व एमएमआरडीचे ५० कर्मचारी अविरत मेहनत घेत होते.

EPFO news : भविष्य निर्वाह निधी खात्यातून पैसे काढणे आता आणखी सोपे! फक्त ३ दिवसांत तुमच्या हातात येणार

या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली. तर ही दुर्घटना कशी झाली या साठी चौकशी समिति देखीत स्थापन झाली आहे आशिया खंडातील सर्वात मोठा बोर्ड अशी याची ओळख होती. या होर्डिंगचं कंत्राट असलेला त्याचा मालक भावेश भिंडे हा फरार आहे. तर मुंबई पोलीसांची सात पथक त्याचा शोध घेत आहेत.

आज सकाळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी घटनास्थळाला भेट देत बचाव कार्याची पाहणी केली. यावेळी माध्यमांना माहिती देतांना बीएमसी आय़ुक्त भूषण गगरानी म्हणाले, बचावकार्य पूर्ण झाले आहे. आता होर्डिंगचा ढिगारा उरला आहे. त्या खाली कुणीही अडकलेले नाही. हे बचाव कार्य एनडीआरएफ, बीपीसीएल, एमएमआरडीए, अग्निशमन दल, बीएमसी यांच्या पथकाने राबवले. सर्वांनी समन्वय राखून ही बचाव मोहीम राबवली. अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. होर्डिंग्ज लावण्याची जी नियमावली आहे तिचे पालन झाले नाही तर थेट कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. रेल्वेला देखील या नियमांचे पालन करण्याचे सांगण्यात आले आहे. तशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. रेल्वेने संबंधित होर्डिंग से स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीचे प्रमाणपत्र महानगरपालिकेला सादर केले पाहिजे असे देखील ते म्हणाले.

IPL_Entry_Point

विभाग