गणेशोत्सवाला आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्व गणेश भक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते तो क्षण आला आला आहे. मुंबईतील लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन समोर आलं आहे. ०७ सप्टेंबरला गणरायाचं आगमन होणार आहे. तत्पुर्वी लालबागचा राजाची पहिली झलक समोर आली आहे. लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन घेण्यासाठी भाविक आतुर होते. लालबागच्या राजाचं हे रूप पाहून भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे.
पाहा VIDEO -
यंदाचं लालबागच्या राजाचं हे ९१ वं वर्ष आहे. यंदा लालबागच्या राजाचा पोशाख मरुन रंगाचा आहे. देशभरात लालबागच्या राजाची विशेष ख्याती आहे. यंदा लालबाग राजाला काशी विश्वनाथ मंदिराची थीम ठेवण्यात आहे. लालबागचा राजा केवळ एक गणपती मूर्ती नाही तर ही मुंबईची संस्कृती, एकता आणि भावनेचे प्रतीक आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या काळात ही भव्य मूर्ती लाखो लोकांच्या आस्था आणि प्रेमाचे केंद्रस्थान असते. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लोक दोन-दोन दिवस दर्शनाच्या रांगेत उभे असतात.
लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) मुंबईतील सर्वात लोकप्रिय सार्वजानिक गणेश मंडळ आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून लालबागच्या राजाची दिव्य मूर्ती पहिल्यांदा १९३४ मध्ये स्थापित केली होती. कोळी बांधवांकडून मच्छिमारांकडून पहिल्यांदा या गणेश मूर्तीची स्थापना केली होती.
लालबागच्या राजाचे दर्शन गणेश चर्तुर्थीपासून म्हणजेच शनिवारी ७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होईल. लालबागच्या राजाचे दर्शन हे गणपती विसर्जनापर्यंत २४ तास सुरू असेल. लालबागच्या राजाचा आरती सोहळा ७ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत दररोज दोनदा म्हणजेच दुपारी साडेबारा वाजता व रात्री ८ वाजता होईल.
लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी, नवस बोलण्यासाठी राज्यातील तसेच देशभरातील लाखो भाविक गणेश चतुर्थीच्या ११ दिवसात मंडपात गर्दी करतात.