Raj Thackeray: राज ठाकरे तब्बल ४ मिनिटं लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक; चर्चा तर होणारच, VIDEO
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray: राज ठाकरे तब्बल ४ मिनिटं लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक; चर्चा तर होणारच, VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरे तब्बल ४ मिनिटं लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक; चर्चा तर होणारच, VIDEO

Updated Sep 11, 2024 12:25 AM IST

Thackeray reached lalbag cha raja : राज ठाकरेंनी लालबागच्या राजाच्या पायावर माथा टेकवून आशीर्वाद घेतले. राज ठाकरेंनी तब्बल तीन ते चार मिनिटं बाप्पांच्या पायावर डोकं टेकवलं होतं.

राज ठाकरे तब्बल ४ मिनटं लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक
राज ठाकरे तब्बल ४ मिनटं लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी सहकुटूंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि तब्बल ४ मिनिटं बाप्पाच्या पायावर डोकं ठेवून होते. यावेळी त्यांनी बाप्पांकडे नेमकं काय मागितलं? यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे या देखील होत्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी लालबाग-परळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. लालबाग-परळ मधील प्रमुख मंडळांच्या बाप्पांचं राज ठाकरे यांनी दर्शन घेतलं. लालबागचा राजा, मुंबईचा राजा तसेच चिंचपोकळीच्या चिंतामणीसह इतरही मंडळांना राज ठाकरेंनी भेट दिली. अरुणोदय मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाला राज ठाकरे दाखल झाले होते. लालबागमध्ये राज ठाकरे बाप्पाच्या चरणी ४ ते ५ मिनिटे नतमस्तक झाले अशाही चर्चा रंगल्या. राज ठाकरे यांनी सपत्निक लालबागच्या दारी हजेरी लावली होती.

राज ठाकरेंनी लालबागच्या राजाच्या पायावर माथा टेकवून आशीर्वाद घेतले. राज ठाकरेंनी तब्बल तीन ते चार मिनिटं बाप्पांच्या पायावर डोकं टेकवलं होतं. स्पष्ट आहे की, यावेळी त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार चालू असतील,  मात्र तरीही त्यांनी बाप्पाकडं नेमकं काय मागितलं असेल, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना व राज्यातील जनतेला पडला आहे.

राज्यात निवडणुकांचे वारे पाहत असून दसऱ्यानंतर विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. मनसेने मराठवाडा व विदर्भात आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामुळे या निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आगामी निवडणुकीत पक्षाला चागलं यश मिळू दे, असं साकडं तर राज ठाकरेंनी बाप्पांना घातलं नसेल?

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन राज ठाकरेंच्या बाप्पा दर्शनाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

अनेक नेते लालबागच्या राजाच्या चरणी लीन-

दरम्यान महाराष्ट्रात सध्या गणेश उत्सवाची धूम सुरू असून अनेक नेते गणेश मंडळांना भेटी देत आहेत. काल अमित शहांनी सपत्निक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी लालबागच्या राजाच्या दरबाराज हजेरी लावली होती. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीका करत म्हटले की, कधीही मंदिरात न जाणारे शरद पवार केवळ निवडणुका आल्यामुळे मंदिरांना व गणेश मंडळांना भेटी देत आहेत. अजित पवारांनी आज पुण्यातील गणेश मंडळांना भेटी दिल्या.  त्यांनी दगडूशेठ गणपतीची आरती केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर