मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईत एकाच घरात आढळले चार मृतदेह; पती-पत्नीने आत्महत्येआधी केला मुलांचा खून?

मुंबईत एकाच घरात आढळले चार मृतदेह; पती-पत्नीने आत्महत्येआधी केला मुलांचा खून?

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jul 29, 2022 02:51 PM IST

मुंबईतील गोवंडी इथं एकाच घरात चार जणांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. पती-पत्नीने आत्महत्या करण्याआधी लहान मुलांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

क्राइम न्यूज
क्राइम न्यूज (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

मुंबईत एकाच घरात चार मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे. गोवंडी इथं ही घटना समोर आली असून अद्याप चौघांच्या मृत्यूचे कारण समोर आलेलं नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. गोवंडीतील शिवाजीनगर भागात ही घटना घडली आहे. चार मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचं समजते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पती पत्नीने त्यांच्या ७ आणि ३ वर्षांच्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गोवंडीत शिवाजीनगर इथं इंदिरानगर परिसार शाकील खान हे राहत होते. त्यांच्यासह कुटुंबात पत्नी आणि दोन लहान मुलं होतं. शुक्रवारी सकाळी शकील खान यांच्या घरी त्यांच्यासह इतर तिघांचे मृतदेह आढळून आले.

एकाच घरात चार मृतेदह असल्याची माहिती पोलिसांना मिळताच मुंबई पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृत्यू झालेल्यांची नावे शकील खान (वय ३४ वर्षे), पत्नी रजिया खान (वय २५ वर्षे), मुलगा सरफराज (वय ०७ वर्षे), मुलगी अतिसा (वय ०३ वर्षे) अशी आहेत. यामध्ये पती आणि पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्याआधी त्यांनी मुलांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या