मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Deepak Sawant Accident : माजी मंत्री डॉ. दीपक सावंत कार अपघातात जखमी

Deepak Sawant Accident : माजी मंत्री डॉ. दीपक सावंत कार अपघातात जखमी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 20, 2023 02:55 PM IST

Deepak Sawant Car Accident : राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत हे कार अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Deepak Sawant
Deepak Sawant

Deepak Sawant Car Accident : राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या कारला काशी मिरा इथं अपघात झाला आहे. अपघातात ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डॉ. सावंत हे आज सकाळी पालघरच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा जात होते. पालघरच्या दिशेनं जात असताना पावणे बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावर काशी मिरा परिसरातील सगणाई नाका इथं दीपक सावंत यांच्या कारला एका डंपरनं मागच्या बाजूनं धडक दिली. यात सावंत हे जखमी झाले. त्यांच्या पाठीला व मानेला दुखापत झाली आहे. ट्रकच्या धडकेत त्यांच्या कारचंही मोठं नुकसान झालं आहे.

दीपक सावंत यांची अपघातग्रस्त कार
दीपक सावंत यांची अपघातग्रस्त कार

अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी त्यांना तातडीनं रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यानंतर सावंत हे स्वतः रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचले. डंपर चालकाला काशी मिरा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सावंत यांच्यावर सध्या अंधेरी येथील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दीपक सावंत हे शिवसेनेत सक्रिय असून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात ते आरोग्यमंत्री होते. शिवसेनेच्या आरोग्य विषयक उपक्रमात दीपक सावंत यांचा प्रामुख्यानं पुढाकार असतो.

WhatsApp channel