मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Fire : अंधेरीत इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Mumbai Fire : अंधेरीत इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 04, 2024 10:29 PM IST

Andheri Fire News : अंधेरी पूर्व येथीलमरोळ मिलिटरी रोड भागातील एका रहिवाशी इमारतीला सोमवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास आग लागली.

अंधेरीत इमारतीला भीषण आग
अंधेरीत इमारतीला भीषण आग

मुंबईतील अंधेरी पूर्वमधील एका इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मरोळ मिलिटरी रोड परिसरातील या इमारतीला लागलेल्या आगीत सर्वत्र धुराचे लोट दिसत आहेत.  इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही आग लागली. या आगीनंतर इमारतीमधील रहिवाशांमध्ये गोंधळ माजला. मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून या आगीत कोणत्याही जिवीतहानीचे वृत्त नाही. 

अंधेरी पूर्व येथील मरोळ मिलिटरी रोड भागातील एका रहिवाशी इमारतीला सोमवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. जगदीश अपार्टमेंट या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली. आग लागली तेव्हा इमारतीत ५० पेक्षा अधिक नागरिक अडकले होते. या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एक महिला व लहान मुलगा अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. घटनास्थळी महापालिकेचे अधिकारी, अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी आणि मुंबई पोलीस तत्काळ दाखल झाले.

WhatsApp channel

विभाग