Mumbai Fire : मालाडमध्ये अग्नीतांडव; खडकपाडा फर्निचर मार्केटला भीषण आग, ५ गोदामं जळून खाक! VIDEO
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Fire : मालाडमध्ये अग्नीतांडव; खडकपाडा फर्निचर मार्केटला भीषण आग, ५ गोदामं जळून खाक! VIDEO

Mumbai Fire : मालाडमध्ये अग्नीतांडव; खडकपाडा फर्निचर मार्केटला भीषण आग, ५ गोदामं जळून खाक! VIDEO

Jan 25, 2025 01:26 PM IST

Malad Fire : मालाड खडकपाडा परिसरातील एका गोदामाला आग लागली होती. क्षणात आगीचा भडका उडाला व व आसपासच्या अन्य गोदामांपर्यंत पसरली.

फर्निचर मार्केटला आग
फर्निचर मार्केटला आग

Mumbai Fire news : मुंबई पश्चिम उपनगर असलेल्या मालाड परिसरात भीषण आगीची घटना समोर आली आहे. मालाड-दिंडोशी दरम्यान खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांना आग लागली आहे. सुरुवातीला एका फर्निचरच्या गोदामाला लागलेली आग अन्य गोदामांत पसरली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी अनेक गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. संपूर्ण आकाशात आग व काळ्या धुराचा प्रचंड लोळ उठल्याचे दिसत आहे. धूर दूर अंतरावरून दिसत असल्याने आगीची तीव्रता लक्षात येते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,खडकपाडा परिसरातील एका गोदामाला आग लागली होती. क्षणात आगीचा भडका उडाला व व आसपासच्या अन्य गोदामांपर्यंत पसरली. लाकडी साहित्यांचे गोदाम असल्याने आग प्रचंड वेगाने पसरली व आगीचा मोठा भडका उडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

खडकपाडा येथीलआगीत अद्याप कोणतीही जीवितहानीची माहिती समोर आलेलीनाही. घटनास्थळावर अग्निशन दल,रुग्णवाहिका आणि पोलीस दाखल झाले आहेत. आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.लाकडी गोदामं एकमेकांला खेडून असल्याने आग पसरत चालली आहे, त्यामुळेआगीवर नियंत्रण मिळवणं कठीण असल्याचं सांगितलं जात आहे.

आगीत मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नेमकी आग कशामुळे लागली,याची माहिती अद्याप समोर आली नाही. लोकांची वर्दळ असलेल्या खडकपाडा परिसरात आग लागल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्याचबरोबर परिसरातील अन्य दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मालाड जवळीलखडकपाडापरिसरलाकडी फर्निचरसाठी ओळखलं जातं. येथे फर्निचरचंमोठं मार्केट आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर