Mumbai Fire : मुंबईच्या लोअर परळमधील इमारतीला भीषण आग, परिसरात आग व धुराचे प्रचंड लोट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Fire : मुंबईच्या लोअर परळमधील इमारतीला भीषण आग, परिसरात आग व धुराचे प्रचंड लोट

Mumbai Fire : मुंबईच्या लोअर परळमधील इमारतीला भीषण आग, परिसरात आग व धुराचे प्रचंड लोट

Jun 03, 2024 06:05 PM IST

Mumbai Fire news : लोअर परळभागातीलशाह अँड नाहर इंडस्ट्रीजच्या गाळ्याला हीआग लागली होती. इमारतीमध्ये शाह अँड नाहर इंडस्ट्रीजचा एक गाळा आहे. याला आग लागल्यानंतर नागरिकांच्या पळापळ झाली.

लोअर परळ भागातील शाह अँड नाहर इंडस्ट्रीजच्या गाळ्याला आग
लोअर परळ भागातील शाह अँड नाहर इंडस्ट्रीजच्या गाळ्याला आग

fire breakes out in lower parel : मुंबईतील लोअर परळ भागातील एका इमारतीत  भीषण  आग लागल्याची घटना घडली आहे. येथील इमारतीतील एका गाळ्याला सोमवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली. आगीची सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीच्या घटनेमुळे परिसरात आग व धुऱाचे लोट दिसू लागले. 

लोअर परळ भागातील शाह अँड नाहर इंडस्ट्रीजच्या गाळ्याला ही आग लागली होती. इमारतीमध्ये शाह अँड नाहर इंडस्ट्रीजचा एक गाळा आहे. याला आग लागल्यानंतर नागरिकांच्या पळापळ झाली. स्थानिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली गेली. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे.

इमारतीतील शाह अँड नाहर इंडस्ट्रीजच्या एका गाळ्याला आग लागल्यानंतर इमारतमधील लोकांमध्ये खळबळ उडाली. गाळयाला आग लागल्यानंतर इमारत रिकामी करण्यात आली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी आग विझविण्यासाठी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले.

मुंबईत भायखळा येथील ५७ मजली इमारतीला भीषण आग -

भायखळा पश्चिम येथील खटाव मिल कंपाऊंडमधील मॉन्टे साऊथ इमारतीच्या ए विंगच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅटला रात्री पावणेअकराच्या सुमारास आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग दहाव्या मजल्यावरील फ्लॅटपुरती मर्यादित असली तरी संपूर्ण मजल्यावर धुराचे लोट पसरले होते. इमारतीच्या वरच्या मजल्यावर काही लोक अडकले आहेत. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि अग्निशमन दलाच्या इतर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलिस, १०८ रुग्णवाहिका, बेस्टची वीज शाखा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्थानिक वॉर्ड कर्मचारी तैनात करण्यात आले.

धारावी झोपडपट्टीतील एका औद्योगिक वसाहतीला आग

शहरातील धारावी झोपडपट्टीतील एका औद्योगिक वसाहतीला लागलेल्या आगीत सहा जण जखमी झाल्याची घटना सहा दिवसांपूर्वी घडली होती. काळा किल्ला येथील अशोक मिल कंपाऊंडमधील तीन मजली आणि चार मजली इमारतींमध्ये पहाटे पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग एका कापड कारखान्यापासून लागली. त्यानंतर आग सर्वत्र पसरली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर