मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai BJP Office Fire :मोठी बातमी! मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाला आग, परिसरात धुराचे लोट

Mumbai BJP Office Fire :मोठी बातमी! मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाला आग, परिसरात धुराचे लोट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 21, 2024 05:11 PM IST

Mumbai Bjp Office Fire : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मुंबईतील भाजप कार्यालयात आग लागल्याची घटना समोर आली आहे. कार्यालयात वेल्डींगचे काम सुरू असताना ही लाग लागल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाला आग
मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाला आग

Mumbai BJP Office Fire : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची धूमधाम सुरू असून प्रचार मोहिमेने वेग घेतला आहे. याच दरम्यान, मुंबईत भाजप कार्यालयात (bjp Mumbai office fire) आग लागल्याची घटना समोर आली आहे. भाजप कार्यालयातील किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरु असताना ही आग लागली. या आगीच्या घटनेमुळे परिसरात धुराचे लोट दिसत आहेत. या आगीवर (Mumbai Bjp Office Fire) नियत्रंण मिळविण्याचं काम सुरु आहे. आगी लागली तेव्हा अनेक कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित होते.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यालय (Bjp state Office) आहे. या कार्यालयातून मुंबईसह राज्यभरातील भाजप पक्ष संघटनेचे कामकाज पाहिले जाते. आज कार्यालयात डागडुजीचे काम सुरू होते. त्यादरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे. पाहता-पाहता आग संपूर्ण कार्यालयात पसरली. यावेळी आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार कार्यालयातील किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना शॉर्ट सर्किट होऊन आग पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले गेले. रविवार कार्यालयाला सुट्टी असल्यामुळे कार्यालयात वर्दळ कमी होती. मात्र सोशल मीडियाचे काम करणाऱ्या टीममधील काही लोक कार्यालयात होते.

आगीची घटना मिळाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार प्रसाद लाड कार्यालयात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. माध्यमांशी बोलत असताना प्रसाद लाड म्हणाले की,ही आग मुख्य कार्यालयात लागली नसून कार्यालयाच्या मागच्या बाजूस लागली होती. त्यामुळे कार्यालयाचे फार नुकसान झालेले नाही.

 

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) म्हणाले की, आग लागली तेव्हा जवळपास १०० माणसे आत होते. मात्र त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. अग्निशमक दलाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे आग लवकर नियंत्रणात आली. कदाचित आगीमुळे मोठे नुकसान होऊ शकले असते. पण वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठे नुकसान टळले आहे.

 

IPL_Entry_Point

विभाग