मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास एका हॉटेलमध्ये आग लागली. या घटनेत कोणत्याही जिवीतहानीचे वृत्त नाही. एलबीएस मार्गावरील हॉटेल रंगून जायका येथे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या व वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही कमी तीव्रतेची आग आहे. अद्याप कोणत्याही जिवीतहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, पोलीस आणि वीज मंडळाचे कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित आहेत.
मुंबईत आगीचंसत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईच्या कुर्ला येथील रंगुन जायका हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.आगी लागल्याच्या घटनेनंतरहॉटेल परिसरात एकच धावाधाव झाली.लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले वआगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नतत्काळसुरुकेले गेले.
कुर्ला पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्गावर कल्पना टॉकीजच्या समोर असलेल्या रंगून जायका हॉटेलला शनिवारी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग काही वेळातच भडकली. एलबीएस मार्गावर एकमेकांना खेटून दुकाने व हॉटेल्स असल्याने आग वेगाने पसण्याची भीती आहे. घटनास्थळी पालिका विभाग कार्यालयाचे पथक, अग्निशमन दलाचे पथक, चार फायर इंजिन, तीन पाण्याचे ट्रँकर, पोलीस, विद्युत वितरण कंपनीचे पथक दाखल आहे. आग विझवण्याचे काम रात्री उशीरपर्यंत सुरु होते.
संबंधित बातम्या