Mumbai Fire : मुंबईतील गोरेगाव येथील ३१ मजली इमारतीला आग, दोन जणांची प्रकृती चिंतानजक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Fire : मुंबईतील गोरेगाव येथील ३१ मजली इमारतीला आग, दोन जणांची प्रकृती चिंतानजक

Mumbai Fire : मुंबईतील गोरेगाव येथील ३१ मजली इमारतीला आग, दोन जणांची प्रकृती चिंतानजक

Nov 02, 2024 04:53 PM IST

Goregaon 31-Storey Building Fire: मुंबईतील गोरेगाव येथील बहुमजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली.

मुंबई: गोरेगाव येथील बहुमजली इमारतीला आग
मुंबई: गोरेगाव येथील बहुमजली इमारतीला आग

Mumbai Fire News Today: सणासुदीच्या काळात मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून एकापाठून एक आगीच्या घटना समोर येत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी सायन, अंधेरी आणि गिरगाव येथील इमारतीला आग लागली. या घटनेला एक दिवस उलटला नाही तोच, गोरेगाव येथील बहुमजली इमारतीला आग आज दुपारी (०२ ऑक्टोबर २०२४) आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. परंतु, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने दोन जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेतील कल्पतरू रेडियन्स या ३१ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दुपारी १२.४९ मिनिटांनी आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दुपारी २.१८ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, श्वास घेताना त्रास होत असल्याने दोन जणांना ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मनोज चौहान (वय, अंदाजे ३५ वर्ष आणि शहाबुद्दीन (वय, ५०) अशी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुंबई: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ३ ठिकाणी आग

मुंबई शुक्रवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तीन ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या.सुदैवाने, या तीनही घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मध्य मुंबईतील सायन परिसरातील फिनिक्स रोडवरील षण्मुखानंद हॉलजवळील राशन दुकानाला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आग लागली. यानंतर काही वेळातच मुंबईतील अंधेरी भागात एका भंगाराच्या गोदामाला आग लागली. शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या एका उंच इमारतीला भीषण आग लागली आहे. गोरेगावयेथील हब मॉलजवळील लोढा फियोरेन्झा इमारतीच्या ३० व्या मजल्यावर ही आग लागली. या तिन्ही ठिकाणी लागलेल्या आगीचे कारण अस्पष्ट असून अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ऐन दिवाळीत आगीच्या घटना घडल्याने नागरिकांच्या आनंदावर पाणी फेरले आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर