Mumbai Fire News: मुंबईतील अंधेरी येथील एका निवासी इमारतीच्या १३ व्या मजल्यावर सोमवारी रात्री भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाने या आगीला लेव्हल-II असे घोषित केले असून या घटनेत एका वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती दिली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून आगीचे नेमके कारण शोधले जात आहे.
मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेटजवळील ओबेरॉय कॉम्प्लेक्समधील स्काय पॅन बिल्डिंगला सोमवारी भीषण आग लागली.या इमारतीच्या १३व्या मजल्यावर आग रात्री ११.२० वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस रुग्णवाहिका आणि अदानी वीज वितरण कंपनीसह अनेक एजन्सी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मंगळवारी मध्यरात्री १.४९ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण ठेवण्यात आले. कोकिलाबेन रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७५ वर्षीय राहुल मिश्रा यांचा श्वास गुदमरल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर, ३८ वर्षीय रौनक मिश्रा यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या