मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sion Fire : मुंबईच्या सायन कोळीवाडा येथील रहिवासी इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

Sion Fire : मुंबईच्या सायन कोळीवाडा येथील रहिवासी इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 30, 2023 04:35 PM IST

Mumbai Fire : मुंबईच्या सायन कोळीवाडा परिसरातील एमए रोडवर एका १९ मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे.

Mumbai: Fire breaks out in a 19-storey high rise at Sion Koliwada
Mumbai: Fire breaks out in a 19-storey high rise at Sion Koliwada

Mumbai Fire: मुंबईच्या सायन कोळीवाडा परिसरातील १९ मजली रहिवाशी इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आग कशामुळे लागली? यामागचे नेमकं कारण अद्याप समोर आले नसून शार्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

सायन कोळीवाडा परिसरात एमए रोडवर ही इमारत आहे. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर आज दुपारी आग लागली.या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या, एक जंबो वॉटर टँकर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. 

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एम ए रोडवरील ओम शिव शक्ती इमारतीच्या सातव्या मजल्यावर आज दुपारी आग लागली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे माहिती समोर आली नाही.

IPL_Entry_Point

विभाग