Mumbai Fire News: मुंबईतील गोरेगाव येथील एका उंच इमारतीला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
मुंंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या एका उंच इमारतीला भीषण आग लागली आहे. गोरेगावयेथील हब मॉलजवळील लोढा फियोरेन्झा इमारतीच्या ३० व्या मजल्यावर ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री नऊ वाजता आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, असे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले.
मुंबईतील सायन परिसरातील फिनिक्स रोडवरील षण्मुखानंद हॉलजवळील राशन दुकानाला आज संध्याकाळी ७.०० वाजताच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक पोलिस आणि बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. नेमके आग कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही. सुदैवाने, या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबईतील अंधेरी भागात एका भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली. आज संध्याकाळी ८.०० वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनस्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अस्पष्ट असून या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी न झाल्यचे वृत्त आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.