Mumbai Fire: मुंबईतील वरळी येथील पूनम चेंबरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Fire: मुंबईतील वरळी येथील पूनम चेंबरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

Mumbai Fire: मुंबईतील वरळी येथील पूनम चेंबरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

Dec 15, 2024 04:19 PM IST

Mumbai Worli Poonam Chambers Fire: मुंबईतील पूनम चेंबरमध्ये भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली.

मुंबईतील वरळी येथील पूनम चेंबरमध्ये भीषण आग
मुंबईतील वरळी येथील पूनम चेंबरमध्ये भीषण आग

Mumbai Fire News Today: मुंबईतील वरळी येथे भीषण आग लागल्याची घटना घडली. पूनम चेंबर येथील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आगली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मुंबईतील वरळी परिसरातील पूनम चेंबर्सला रविवारी सकाळी आग लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. एमएफबीने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजून ३९ मिनिटांनी ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच एमएफबी, पोलिस, बेस्ट, १०८ रुग्णवाहिका आणि वॉर्डचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आग नेमके कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही. पण शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वरळी येथील पूनम चेंबर्सला भेट दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या आत जात असून लवकरच कुलिंग ऑपरेशन सुरू होईल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी एएनआयशी बोलताना दिली. मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत अद्याप कोणीही जखमी झाले नाही. आज सकाळी ११ वाजून ३९ मिनिटांनी ही आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर