Malad Fire News Today: मालाड पूर्व येथील दफ्तरी रोडवर असलेल्या आठ मजली व्यावसायिक इमारतीला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील गारमेन्टच्या दुकानाला आग लागल्याचे सांगितले जात आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मालाड पूर्व येथील दिंडोशी येथील व्यावसायिक इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील गारमेन्टच्या दुकानाला आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आग लागली. इमारतीच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर धुराचे लोट पसरल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी ताबडतोब अग्निशमनदलाला याबाबत माहिती दिली. यानंतर अग्निशमनदलाच्या ८ गाड्या घटना घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनदलाला यश आले असून या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी दुपारी मुंबई-गोरखपूर गोदान एक्स्प्रेसच्या एका डब्याला अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली होती. आग लागल्याची माहिती मिळताच ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमनदलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. अचानक लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
संबंधित बातम्या