Mumbai Oshivra Fire: मुंबई येथील ओशीवराय येथे असलेल्या फर्निचर मार्केटला भीषण आग लागली आहे. या आगीत तब्बल १२ सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या आगीत तब्बल २० ते २५ दुकाने भस्मसात झाली आहे. अग्निशामक दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ही आग एवढी भीषण आहे की दूरवरून आगीचे लोट दिसून येत होते. या घटनेत कुणी जखमी वा मृत्युमुखी पडल्याची अद्याप माहिती नाही. स्थानिक नागरिक व अग्निशामक दलाचे कर्मचारी बचावकार्य राबवत आहेत.
मुंबईतील ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला मोठी आग लागली आहे. ही आग दुपारी १२ च्या सुमारास लागली. ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. अंधेरी पश्चिमेकडील जोगेश्वरी ओशिवरा येथे मोठे फर्निचर मार्केट असून या मार्केटला ही आग लागली आहे. या ठिकाणी लाकडी साहित्य असल्याने आगीने काही क्षणात उग्र रूप धारण केले. आगीचा भडका उडल्यावर तब्बल १२ सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटांमुळे आग आणखी भडकली. स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आणखी भडकली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य राबावण्यास सुरुवात झाली आहे.
ही आग मोठी असून आगीचे लोट दूरवरून दिसून येत आहे. परिसरात मोठी गर्दी जमली आहे. अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. १० ते १२ सिलेंडर या आगीमध्ये फुटले आहे. या आगीत आगीत २० ते २५ दुकाने जळून खाक झाली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात फर्निचरच्या मार्केट आहेत. त्यामुळे ही आग आणखी पसरण्याची शक्यता आहे. मात्र, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आग मोठ्या प्रमाणात वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
सध्यातरी या घटनेत कुणी जखमी तसेच मृत्युमुखी पडल्याची माहिती नाही. आग नियंत्रणात आल्यावर या बाबत माहिती मिळू शकणार आहे.
संबंधित बातम्या