मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BKC Dasara Melava LIVE Updates: कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्या सारखा दुटप्पी नव्हता : एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

BKC Dasara Melava LIVE Updates: कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्या सारखा दुटप्पी नव्हता : एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Oct 05, 2022 10:03 PM IST

Eknath Shinde Dasara Rally LIVE Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानावर होत आहे. जाणून घेऊया मेळाव्याबद्दलचे सर्व अपडेट्स

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde Camp Dasara Melava LIVE Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बंडखोर गटाचा मेळावा मुंबईच्या वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होत आहे. शिंदे गटाच्या आमदार व खासदारांनी मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे. जाणून घेऊया या मेळाव्याचे लाइव्ह अपडेट्स

 

 

एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याचे Live Updates

देशविघातक घोषणा देणाऱ्या पिलावळींना ठेचून काढले जाईल : मुख्यमंत्री शिंदे

आज हिंदुस्थानात राहून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. त्यावर तुम्ही एक चकार शब्द काढू शकले नाही. पण मी आज इथे व्यासपीठावरून सांगतोय अशा घोषणा दिल्या जाणाऱ्या पिलावलीला ठेचून काढलं जाईल. इथे अब्दुल सत्तार बसले आहेत. देशभक्त आणि हिंदुत्ववादी पक्ष आपला बाळासाहेबांची भूमिका आपण पुढे नेत असताना इतर समाजाचा एक इतर धर्माचाही आदर करणारे आम्ही लोक आहोत. आमच्या पाठीशी बाळासाहेबांची शिकवण आहे. या देशाच्या एकात्मतेला अखंडतेला नख लावण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर यापुढे बिलकुल तो खपवून घेतला जाणार नाही. पीएफआय संघटनेवर बंदी घातली तेव्हा एकाही शब्दाने तुम्हाला बोलता आलं नाही. . मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सांगितलं होतं केंद्राने मोदी साहेबांनी आणि अमित शहा यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. या राज्यामध्ये देखील तो पाळला जाईल . या राज्यात आणि देशात या देशाच्या विरोधामध्ये कारवाया करणारा सोडलं जाणार नाही.

 

राज ठाकरे, जयदेव ठाकरे, नारायण राणे हे देखील यांच्यामुळे बाहेर पडले : शिंदे यांचा हल्लाबोल

शिवसनेने अनेक बंड पाहिली. नारायण राणे, राज ठाकरे यासारखे अनेक बन्द मी पाहिली. आज ४० जण सोडून गेले. तुमच्या कडे केवळ १० जण आहेत. आज शेकडो जण मला पाठिंबा देत आहेत. जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख लाखो शिवसैनिकांना तुम्ही गद्दार गद्दार म्हणता. फोडण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा. तेथे निहार बसलाय. वहिनी बसली आहे. मग कोण चुकीचं आहे, याच कधीतरी आत्मपरीक्षण आत्मचिंतन करणार की नाही. सध्या फक्त चौकडीच्या मध्ये राहून त्यांनी सांगायचं तस वागायच. मी सांगितले तर ते तुम्हाला आवडलं नाही. तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष पूर्ण करायची होती त्यासाठी तुम्ही शिवसेनेचं जे काय पाणीपत होत चाललं ते उघड्या डोळ्यांनी पाहत होता. कुठल्या परिस्थितीत शिवसेना भाजप युतीचे सरकार झालं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आम्हाला जो निर्णय घ्यावा लागलातो आनंदाने घेतला. तीन महिन्यापूर्वी जूनमध्ये त्याचा उद्रेक झाला. त्याची दखल राज्याने नाही देशाने घेतली. आमची ही क्रांती होती आणि म्हणून इंग्रजांना देखील १८५७ विरोधात जो उठाव केला तेव्हा देखील काही लोकांना ती गद्दारी वातली होती. हा एकनाथ शिंदे हा जनतेच्या सेवेसाठी अखंड काम करणारा कार्यकर्ता आहे. मला जीवाची परवा नाही. वेडे लोक इतिहास घडवत असतात आणि म्हणून तुम्ही सांगताय की भाजप बरोबर जायचं होतं तर राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जायला हवे होते. तुमचा कार भार कोणालाही आवडत नव्हता. फक्त कोविड कोविड करून आपण सगळ्यांना घरात बसवलं. दुकान बंद केली मंदिरा बंद केली. बाजारपेठ बंद केल्या पण तुमची दुकान मात्र सुरू होती. काय कसली होती ती मी बोलत नाही पण चालू होतं ते मला माहित होतं माझ्याशिवाय जास्त कोणाला माहित असता एकेकाळी या देशात हिंदूला हिंदू म्हणून घ्यायची भीती वाटायची. बाळासाहेबांनी ती परिस्थिती बदलली, गर्भाचे काम हिंदू आहे हा नारा बाळासाहेबांनी बुलंद केला पण आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी आमच्या नेतृत्वाला हिंदुत्व सोडावं लागलं हे दुर्दैवा बाळासाहेबांचा उल्लेख हिंदुरुदय सम्राट करताना देखील तुमची जीभ कचरू लागली. तुम्ही त्यांना केवळ शिवसेनाप्रमुख म्हणू लागला. मग मला सांगा विचारांची कास कोणी सोडली. स्वामी सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लागला यातच तुम्हाला खुशी होती. सरकार मात्र काँग्रेस एनसीपी चालवत होते. सेनेचा झेंडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा या मंत्रालयात सुरुवात हे उघड्या डोळ्यांनी पाहिले.

 

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विकले : एकनाथ शिंदे

तुम्ही म्हणता बाळासाहेब चोरणारी टोळी निर्माण झाली आहे. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले. तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. मग खरे गद्दार कोण जनतेला समजले म्हणून जनता आमच्याबरोबर आहे. किती मोठ्या प्रमाणावर लोक आले. मैदानात आत मध्ये तेवढेच बाहेर देखील आहेत. बाळासाहेबांच्या विचाराशी आम्ही कायम आहोत. आमचे विचार बदलणार नाहीत बदलले नाही. पण तुम्ही मात्र सत्तेसाठी लाचार झाला. बाळासाहेबांनी कायम हिंदुत्वाचा पुरस्कार केला. पण हिंदुत्ववादी राजकारण करून चूक केली असं राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये विधानसभेत तुम्ही सांगितलं. मुंबईचा बॉम्बस्फोट ज्यांनी घडवले शेकडो लोकांच्या निष्पाप लोकांचे प्राण ज्यांनी घेतले त्यांना तुम्ही मंत्रीपद देता? मुंबईकरांच्या जखमेवर किती मीठ चोळणार ? बाळासाहेबांच्या भूमिकेला तुम्ही चुकीचं ठरवलं. सत्तेसाठी सगळं सोडलं आणि आता आम्हाला कोणी केले का तरी तुम्ही केली गद्दारी आम्ही गद्दार नाही तुम्ही गद्दार आणि म्हणून जनतेने ठरवलं की बाळासाहेबांच्या शिलेदारांना साथ द्यायची. पण बाळासाहेबांच्या विचारांना तितांजली देऊन जे तुम्ही पाप केलंय ते शिवसैनिक कदापि विसरणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता देखील तुम्हाला क्षमा करणार नाही.

आम्ही ही बंडखोरीची भूमिका जाहीरपणे घेतली आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आम्ही ही बंडखोरी केली आहे ती जाहीर पणे केली आहे. जर आम्ही चुकलो असतो तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला असतात का हा मला मला प्रश्न विचारायचा आहे. आम्ही जे केलं ते या राज्याच्या हितासाठी शिवसेनेसाठी केले आहे. शिवसैनिकांची शिवसेना आम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करून शिवसेनाप्रमुखांचा विचार सोडला नाही आणि सोडणार पण नाही. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्त्वाचा व्यासपीठावरचे आणि समोर बसलेले प्रत्येक जण हे सगळे बाळासाहेबांचे निष्ठावंत सैनिक आहेत. आम्ही मात्र बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा पुढे नेत आहोत. गेल्या दोन महिन्यांमध्ये गद्दार आणि खोके या व्यतिरिक्त तिसरा शब्द यांना सापडला नाही. होय शंभर टक्के बरोबर आहे गद्दारी झाली ती 2019 ला झालेल्या निवडणुकीत झाली. निवडणुका लढवल्या त्या निवडणुका लढवल्यानंतर जी आघाडी केली त्याच वेळेस गद्दारी झाली. ही गद्दारी राज्यातल्या मतदारांशी केली. ज्या लोकांनी शिवसेना भाजपा युती म्हणून तुम्हाला निवडून दिलं आणि त्यांनी ठरवलं होतं आता महाविकास आघाडी नाही तर शिवसेना भाजपा युतीचे सरकार स्थापन होईल. निवडणुकीमध्ये एका बाजूला बाळासाहेबांचा फोटो दुसऱ्या बाजूला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा फोटो लावला होता की नाही ? आणि मग लोकांनी तुम्हाला युती म्हणून मतदान केलं होतं. लोकांची अपेक्षा होती की युतीचे सरकार स्थापन होईल. पण त्यांच्या मतांची तुम्ही अव्हेहेलना केली. महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही बेइमानी केली आहे. तुम्ही विश्वासघात केलाय. तुम्ही गद्दारी केलेली आहे आणि आम्ही केलेली ही गद्दारी नाही तर गदर आहे. गदर म्हणजे क्रांती. गदर म्हणजे उठाव हे महाराष्ट्राने जाणलेला आहे. आणि म्हणून आम्ही गद्दार नाही.

 

८.५८ शिवसेनेचा रिमोट कंट्रोल उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात

शिवाजी पार्क मिळवलं असते. पण मी आधीच सांगितलं होते की मैदान देण्यामध्ये हस्तक्षेप बिलकुल करायचा नाही. आपल्याला मी सांगतो की सदा सरवनकर यांनी पहिला अर्ज दिला होता. मैदानही आम्हाला मिळालं असतं परंतु या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देखील माझी आहे आणि म्हणून मला सांगायचं काय ते आपल्याला कळलेलं आहे. पण, मैदान जरी मिळालं नाही तरी सुद्धा शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्यासोबत आहेत. शिवसेनाप्रमुखांची भूमिका आमच्या सोबत आहे. ही परंपरा मोडीत तुम्ही काढली. हिंदुत्वाच्या विचारांना बगल तुम्ही दिली. बाळासाहेबांच्या भूमिकेला त्यांच्या विचाराला मूठमाती दिली. त्यांच्या विचारांना तिलांजली दिली. मग मला तुम्ही सांगा तुम्हाला त्या जागेवर उभे राहण्याचा तरी नैतिक अधिकार उरतो का ? बोलण्याचा नैतिक अधिकार तरी उरलाय का ? हजारो शिवसैनिकांनी आपला घाम रक्त सांडून जो पक्ष उभा केला तो फायद्यासाठी महत्त्वकांक्षासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण का टाकला? बाळासाहेब रिमोट कंट्रोल ने सरकार चालवायचे तुम्ही तर सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला. त्यांच्या तालावर तुम्ही नाचू लागलात आणि आम्हाला आणि त्याच बरोबर बाळासाहेबांच्या विचाराला देखील दावणीला बांधले, असा आरोप शिंदे यांनी केला.

२०.४३ बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार कोण हे आज या जनसागराने सिद्ध केले आहे : एकनाथ शिंदे

तुमच्या कॅमेराची तरी नजर जिथपर्यंत पोहोचते का बघा थोडे कॅमेरा तिकडे वळवा आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला खरा महासागराचे दर्शन घडवा. मी माझ्या पत्रकार बांधवांना देखील मी सांगू इच्छितो तुमच्या मनातला गोंधळ आता संपला असेल. हा अथांग जनसागर इथे उसळला आहे. शिवसेना कुठे आहे या प्रश्नाचे उत्तर उभ्या महाराष्ट्राला नाही तर अखंड हिंदुस्तानाला आज या महासागरांन दिलेला आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार कोण आहे कुठे आहे ? त्यांच्या विचारांचे वारसदार कोण असा प्रश कुणालाही पडणार नाही. हे या आपल्या गर्दीने सिद्ध केले आहे.

 

8.34 Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात; मैदानात उपस्थित सर्वांना केला नमस्कार

7.56 आम्हा ठाकरे यांचे काही ठरलेले नसते. एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही काळात ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या खूप आवडल्या. असा माणूस महाराष्ट्राला हवा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या प्रेमापोटी मी या ठिकाणी येथे आलो आहे, चिपळ्या वाजवणारा एकनाथ आणि हा एकनाथ याला जवळच्यांनी संपवले. या एकनाथाला एकटे पडू देऊ नका. हे शेतकऱ्यांचे नेते आहे. एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांचे नेते आहे. ते खऱ्या अर्थाने राबकरी आहे. त्याला पाठिंबा द्या. त्याची साथ सोडू नका. माझे मत आहे की जे जे आता सुरू आहे ते बस कार्य आणि पुन्हा नव्याने निवडणूक घेऊंन एकनाथ शिंदे यांचे राज्य येऊ द्या, असे आवाहन जयदेव ठाकरे यांनी बीकेसी मैदानातून केले.

 

7.36 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बीकेसी मैदानावर दाखल झाले आहे. या ठिकाणी उपस्थितीत मान्यवर त्यांचा सत्कार करत आहेत. त्यांना चांदीची १२ फूटी तलवार भेट केली जाणार असून या तलवारीची पूजा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करून शास्त्रपूजा केली जाणार आहे.

7.22 बंगल्यात बसलेल्या माणसाला सामान्य माणूस कळला नाही, जेव्हा मावळे हे मैदानात लढून धारातीर्थी पडत असतात तेव्हा राज्याने मैदानावर उतरायचे असते, पण उद्धव ठाकरे हे बंगल्यात बसून राहिले. त्यामुळेच आम्ही हे बंड पुकारले, असा आरोप शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी केला.

 

7. 9 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी मैदानात दाखल; मैदानात उपस्थित पोलिस आणि कार्यकर्त्यांना केला नमस्कार

 

7.6 : आम्ही आमचे आयुष्य शिवसेनेसाठी वेचले आमची तुलना खोक्यांमध्ये कशी होऊ शकते? : राहुल शेवाळे यांचा ठाकरे यांना सवाल

 

7.00 Smita Thackeray : बाळासाहेब ठाकरेंच्या सूनबाई पोहचल्या बीकेसी मैदानावर; नातूही सोबत

मुंबई : बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानात शिंदे गटाकडून मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना आज आणखी एका मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाई स्मिता ठाकरे नुकत्याच बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानात पोहोचल्या आहेत. एकनाथ शिंदेंनी आयोजित केलेल्या मेळाव्याला त्या उपस्थित आहेत. यामुळे आता ठाकरे कुटुंबातीलच सदस्यानं अशाप्रकारे शिंदेंना उघडपणे पाठिंबा दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

6.58: ठाकरे केवळ रक्ताने असून चालत नाही, विचारानं असावं लागतं. आम्ही खरे बाळासाहेबांचे वारसदार आहोत - शीतल म्हात्रे

6.56: शिवसेनेच्या नगरसेविका असलेल्या शीतल म्हात्रे यांचे महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप

6.55: शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचं भाषण सुरू

6.53: काय बीकेसी ग्राउंड, काय ती गर्दी, काय ते भगवं वातावरण, काय ते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा द्यायला आलेले तरुण… समदं एकदम ओक्के… एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री ओक्के… हा डायलॉग मारून शहाजी बापू यांनी संपवलं भाषण

6.50: छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाळासाहेब ठाकरे यांचा व धर्मवीर आनंद दिघे यांचा भगवा झेंडा जो एकनाथ शिंदे घेऊन फिरताहेत, त्याची शान राखण्याचं शहाजी पाटील यांचं आवाहन

6.48: एकनाथ शिंदे यांनी बापलेकांना गुवाहाटीचं आयुर्वेदिक इंजेक्शन दिलं. त्यामुळं महाराष्ट्रात पळायला लागले. त्याच शिव्या देतायत. लोकांना भडकवतायत, पण आता पळून फायदा नाही; शहाजी बापू पाटील यांचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला

6.42: शहाजी बापू पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख. फोन करून त्याला बीकेसीतील गर्दी बघायला सांगा, म्हणजे खरी शिवसेना कुठली हे कळेल, असं शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य

6.40: ‘झाडी, डोंगर, हाटील’फेम शहाजी बापू पाटील यांचं भाषण सुरू

6.35: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मेळाव्यात सहभागी होण्यासाठी वर्षा बंगल्याहून बीकेसीच्या दिशेनं रवाना

6.20: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ११ वक्ते भाषण करणार असल्याची चर्चा. त्यात गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, रामदास कदम, आनंदराव अडसूळ, अब्दुल सत्तार, तानाजी पाटील, दीपक केसरकर, भावना गवळी, राहुल शेवाळे आणि श्रीकांत शिंदे यांचा समावेश असल्याचं बोललं जातं.

4.40: दसरा मेळाव्याची आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ट्वीटची मालिका. व्हिडिओ टीझरनंतर आता हरिवंशराय बच्चन यांच्या ओळी ट्वीट करून शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे. सोबत विचारांचेवारसदार असा हॅशटॅगही शेअर केला आहे.

4.30: शिवसेनेच्या मेळाव्यापेक्षा तिप्पट गर्दी एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला होईल, असा विश्वास शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी बोलून दाखवलाय. एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांच्या विचारांचं प्रतिनिधित्व करतात, ते सामान्यांचे नेते आहेत, असंही सत्तार यांनी म्हटलंय.

2.35: दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी केलं सूचक ट्वीट

2.30: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी शेकडो कार व बस मुंबईत दाखल

2.25: शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मूळ पक्षावर दावा केला आहे. तसंच, पक्षाच्या चिन्हावरही हक्क सांगितला आहे. हा वाद निवडणूक आयोगाकडं असतानाच मैदानावरील लढाई सुरू झाली आहे. आजचा दसरा मेळावा हा त्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

2.20: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा.

 

 

IPL_Entry_Point