मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Couple Suicide: मुंबईच्या कांदिवलीत नैराशातून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट

Mumbai Couple Suicide: मुंबईच्या कांदिवलीत नैराशातून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट

May 20, 2024 09:25 PM IST

Elderly Couple Dies By Suicide: मुंबईच्या कांदिवली येथे नैराशातून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

मुंबईच्या कांदिवली येथे नैराशातून वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केली.
मुंबईच्या कांदिवली येथे नैराशातून वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केली.

Kandivali Couple Suicide: कांदिवली पूर्व येथील आर्य चाणक्य नगर वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आर्थिक संकटातून वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना १७ मे २०२० रोजी उघडकीस आली, जेव्हा मृत दाम्पत्य राहत असलेल्या घरातून शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

ट्रेंडिंग न्यूज

प्रमोद चोणकर (वय, ६१) आणि अर्पिता प्रमोद चोणकर (५७) अशी त्यांची नावे आहेत. कांदिवली पूर्व येथील आर्य चाणक्य नगर येथील एका फ्लॅटमध्ये १७ मे रोजी चोणकर दाम्पत्याचे मृतदेह सापडले. मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईट नोट सापडली. मात्र, अद्याप आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. आर्थिक अडचणीमुळे दाम्पत्य नैराशात होते, अशी माहिती समजत आहे. त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोणकर दाम्पत्य अनुभूती सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावर राहायला होते. त्यांना मूलबाळ नव्हते. प्रमोद चोणकर हे रिअल इस्टेट एजंट होते. रहिवाशांनी गेल्या काही दिवसांपासून या जोडप्याला पाहिले नव्हते. गुरुवारी या दाम्पत्याच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी समता नगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडला असता प्रमोद पंख्याला नायलॉनच्या दोरीने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर, त्यांची पत्नी अर्पिता त्यांच्या शेजारी मृतावस्थेत पडली होती.

मुंबई: नोकरीचे आमिष दाखवत तरुणी बलात्कार

मुंबईच्या वरळी परिसरात नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी (१६ मे २०२४) रात्रीच्या सुमारास घडली. जोसेफ जेम्स (वय, ५०) असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे. आरोपीने या घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास पीडिताला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, पीडिताने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या एका वकील मित्राला सांगितला. त्याने पीडिताला ताबडतोब पोलीसांत तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला. यानंतर पीडिताने जवळचे पोलीस ठाणे गाठून तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग