Mumbai Mira Road Murder : मुंबईत मीरा रोड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील शांती शॉपिंग सेंटरमध्ये शुक्रवारी रात्री १० च्या दरम्यान, एका व्यापाऱ्याची दुचाकीवरून आलेल्या एकाने गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घनतेनंतर हल्लेखोर पसार झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शम्स तमरेज अन्सारी उर्फ सोनू (वय ३५) असे हत्या करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. अन्सारी यांचे चष्मा विक्रीचे दुकान आहे. त्यांचे शांती शॉपिंग सेंटरच्या बी विंगमध्ये दुकान आहे. त्यांनी शुक्रवारी रात्री त्यांचे दुकान बंद केले. यावेळी चेहऱ्यावर रुमाल बांधून असलेल्या एकाने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. या घटनेत अन्सारी हे जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. पोलिस देखील तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी अन्सारी यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. हल्लेखोर कोण होते याचा तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीचा शोध घेत आहे.
हत्या झालेले मोहम्मद अन्सारी हा एका मोठ्या गुन्ह्यातील प्रमुख साक्षीदार होते. त्यामुळे त्यांना गेल्या काही दिवसांपासू जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. या बाबत अन्सारी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना पोलिस संरक्षण देणे गरजेचे असतांना त्यांना ते मिळाले नाही. दरम्यान, अन्सारी हे शुक्रवारी रात्री शॉपिंग सेंटर बंद करून उभे असतांना अन्सारीच्या डोक्यात हल्ले खोरांनी गोळी झाडली.
या नंतर आरोपी पसार झाले. हत्या झाल्यावर नयानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटना स्थळाचे पुरावे गोळा केले असून शांती शॉपिंग सेंटर व परिसरात भीतीचे वातावरण आहे. मोहम्मद अन्सारीचा हल्लेखोराशी पूर्वीचा वाद होता का ? या बाजूने देखील तपास केला जात आहे. अन्सारी यांना जीवे मारण्याच्या धमक्या कोणी दिल्या याचा देखील पोलिस तपास करत आहेत.
संबंधित बातम्या