मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोठी बातमी! अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू; फायरिंगचा VIDEO आला समोर, हल्लेखोराचीही आत्महत्या

मोठी बातमी! अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू; फायरिंगचा VIDEO आला समोर, हल्लेखोराचीही आत्महत्या

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 08, 2024 10:27 PM IST

Abhishek Ghosalkar News : युबीटी गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झाला असून गोळीबार करून हल्लेखोर मॉरिसनेही आत्महत्या केली आहे.

Abhishek Ghosalkar firing
Abhishek Ghosalkar firing

उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवकअभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसर येथे गोळीबारात करण्यात आला होता. त्यांच्यावर बोरिवलीच्या करूणा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. अभिषेक हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पूत्रतर नगरसेविका प्रीती घोसाळकर यांचे पती आहेत. दरम्यान, हल्लेखोराने घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्यानंतर स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोर मॉरिसच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. या घटनेनंतर दहिसर परिसरात तनाव निर्माण झाला असून अतिरिक्त पोलिस कुमक मागवून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

उल्हासनगर येथे पोलीस स्टेशनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा राजकीय नेत्यावर गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती आहे. त्यांच्यात काही वैयक्तिक वाद होते, पण ते मिटल्याने ते एकत्र आले होते. मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांनी एकत्र फेसबुक लाईव्ह केले. या फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर आभार मानून खूर्चीवर उठत असतानाच मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. हा संपूर्ण प्रकार फेसबुक लाईव्हमध्ये कैद झाला आहे.

फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर मॉरिसने उठून अभिषेक घोसळकर यांच्यावर समोरून गोळीबार केला. तब्बल ५ गोळ्या झाडण्यात आल्या. यातील तीन गोळ्या घोसळकर यांना लागल्या. गोळीबार केल्यानंतर मॉरिसने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून स्वत:वर गोळी झाडून संपवलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हल्लेखोर मॉरिस याचाहीमृत्यू झालाआहे.अभिषेक यांची हत्या ही पूर्वनियोजित कट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीने अत्यंत थंड डोक्याने त्याला संपवले आहे. फेसबुक लाईव्ह दरम्यान दोघे हसत-खेळत असल्याचे दिसत आहे. आरोपीच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा तणाव दिसत नाही. या प्रकरणाचा तपासदहिसर पोलीस तसेच क्राइम ब्रांच करत आहे.

WhatsApp channel