याला काय म्हणावं..! चोरी करण्यासाठी घरात घुसला, मात्र कोणतेच किमती सामान न मिळाल्याने महिलेचा मुका घेऊन पळून गेला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  याला काय म्हणावं..! चोरी करण्यासाठी घरात घुसला, मात्र कोणतेच किमती सामान न मिळाल्याने महिलेचा मुका घेऊन पळून गेला

याला काय म्हणावं..! चोरी करण्यासाठी घरात घुसला, मात्र कोणतेच किमती सामान न मिळाल्याने महिलेचा मुका घेऊन पळून गेला

Jan 07, 2025 05:35 PM IST

Mumbai Crime : मालाडच्या कुरार भागातएक विचित्र घटना घडली आहे. चोरट्यानं काहीच मुद्देमाल नेला नसून, महिलेचा मुका घेऊन पळ काढला.

 महिलेचा मुका घेऊन पळून गेला चोर
महिलेचा मुका घेऊन पळून गेला चोर

Mumbai crime : मुंबईतील मालाड परिसरातील कुरार येथे एक अजब प्रकार समोर आला आहे. येथील एका घरात चोर चोरी करण्याच्या उद्देशाने घुसला, मात्र घरात त्याला काहीच किमती सामान न मिळाल्याने त्याने घरातील महिलेचा मुका घेतला व घरातून कोणतीच वस्तू न घेता पळ काढला. पोलिसांनी या चोराला पकडले आहे.

मालाडच्या कुरार भागातही विचित्र घटना घडली. चोरट्यानं काहीच मुद्देमाल नेला नसून, थेट महिलेचा मुका घेऊन पळ काढला. ही घटना ३ जानेवारी रोजी घडली होती. आरोपीविरोधात विनयभंग आणि दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. घरात मौल्यवान वस्तू न सापडल्याने त्याने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

३८ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ३ जानेवारी रोजी ती घरात एकटीच होती. त्यावेळी आरोपी घरात घुसला व दरवाजा आतून बंद केला. आरोपीने महिलेचे तोंड दाबून ठेवले वघरातील सर्व किमती सामान, पैसे, मोबाइल आणि एटीएम देण्यास सांगितले. मात्र महिलेने त्याला सांगितले की, घरात काहीच मौल्यवान वस्तू नाहीत, तेव्हा आरोपीने तिचा मुका घेतला व पळून गेला.

महिलेने याबाबत कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद केला आहे. तक्रारीनंतर त्याच दिवशी संध्याकाळी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीत महिलेच्या घराच्या परिसरातीलच आहे. त्याची कोणताही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आरोपी आपल्या कुटूंबासोबत राहतो व सध्या बेरोजगार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर