Mumbai Crime: मुंबईत स्क्रिझोफेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या आईने १० वर्षांच्या मुलाची वायरने गळा आवळून केली हत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Crime: मुंबईत स्क्रिझोफेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या आईने १० वर्षांच्या मुलाची वायरने गळा आवळून केली हत्या

Mumbai Crime: मुंबईत स्क्रिझोफेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या आईने १० वर्षांच्या मुलाची वायरने गळा आवळून केली हत्या

Jan 10, 2025 10:29 AM IST

Mumbai Murder: मुंबईत वांद्रे परिसरात स्क्रिझोफेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या आईने आपल्या १० वर्षांच्या मुलाची वायरने गळा आवळून हत्या केली आहे.

 मुंबईत स्क्रिझोफेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या आईने १० वर्षांच्या मुलाची वायरने गळा आवळून केली हत्या
मुंबईत स्क्रिझोफेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या आईने १० वर्षांच्या मुलाची वायरने गळा आवळून केली हत्या

Mumbai Murder : मुंबईत वांद्रे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्क्रिझोफेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या एका महिलेने तिच्या १० वर्षांच्या मुलाची वायरच्या साह्याने गळा आवळून हत्या केली. ही घटना गुरुवारी संध्याकाळी खेरवाडीच्या वाय कॉलनीत घडली.

अभिलाषा औटी (वय 36) असे मुलाची हत्या केलेल्या आईचे नाव आहे. तर सर्वेश औटी (वय १०) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिलाषा औटी यांना स्क्रिझोफेनिया हा आजार आहे. त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत. या आजाराचा रुग्ण अतिआक्रमक होतो किंवा अतिप्रेमळ वागत असतो. तसेच बरेचदा आपण काय करतो याचे भान सुध्या या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला नसते. अभिलाषा या घरी असतांना त्यांनी त्यांच्या मुलगा सर्वेशचा गळा वायरने आवळला. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे औटी कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

काय आहे घटना ?

औटी हे वांद्रे पूर्वेला असणाऱ्या खेरवाडी परिसरातील वाय कॉलनीत राहतात. मृत सर्वेशचे वडील हे उप-सचिव आहेत. गुरुवारी संध्याकाळी अभिलाषा व त्यांचा मुलगा सर्वेश हे दोघेच घरात होते. अभिलाषा यांना स्क्रिझोफेनिया आजार असल्याने त्यांची मानसिक स्थिती स्थिर नव्हती. गुरुवारी अचानक अभिलाषा यांना राग आला. या रागाच्या भरात त्यांनी त्यांचा मुलगा सर्वेशला ओढत बेडरुममध्ये नेले. त्यानंतर त्यांनी बेडरुमचा दरवाजा यातून लावून घेतला. यावेळी रूममधील वायरने सर्वेशचा गळा आवळला. या घटनेत सर्वेशचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती सर्वेशचे वडील यांना मिळाल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अभिलाषा औटी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे औटी कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. तसेच खेरवाडी परिसरात मुलाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्क्रिझोफेनिया आजारात रुग्णांना वेगवेगळे भास होतात. त्यांना बुद्धीभ्रंश व मनात वेगवेगळे विचार येत असतात. त्यामुळे या आजाराने ग्रस्त व्यक्ती सामान्य नसतात. आजाराच्या रुग्णांना दैनंदिन व्यवहारात काम करणे कठीण होते. तसे त्यांचे वागणे देखील बेभरोशाचे असते.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर