Raghav Tiwari Stabbed With Knife: बॉलिवूड चित्रपट, वेब सिरीज आणि क्राइम पेट्रोलसारख्या प्रसिद्ध शोमध्ये काम करणारा अभिनेता राघव तिवारी याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मुंबईतील वर्सोवा येथे त्याच्यावर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात राघव तिवारी जखमी झाला असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असली तरी अद्याप कोणालाही अटक झाली नाही. राघवने पोलिसांच्या कारवाईवर नाराजी देखील व्यक्त केली आहे.
स्वतः राघव तिवारीने या घटनेची माहिती दिली. त्याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनेच्या दिवशी तो मित्रासोबत खरेदी करून घरी परतत होता. रस्ता ओलांडत असताना त्याची दुचाकीला धडक बसली. यामुळे राघवने त्यांची माफी मागितली. परंतु, आरोपींनी दुचाकीस्वारने त्याला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यावेळी राघवने त्याला शिवीगाळ का करत आहेस? असे विचारले. हे ऐकताच आरोपी संतापला आणि त्याने राघववर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यातून राघवने कसेतरी स्वत:ला वाचवले. पण आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. त्याने लगेच राघवला जोरात लाथ मारली. त्यामुळे तो खाली पडला.
पुढे आरोपीने दुचाकीच्या ट्रंकमधून दारूची बाटली आणि लोखंडी रॉड काढला. स्वत:चा बचाव करण्यासाठी आरोपीने जवळ पडलेले लाकूड उचलून त्याच्या हातावर मारले. मात्र, त्यानंतर दुचाकीस्वारने मागे पुढे न बघता त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात राघव गंभीर जखमी झाला. राघवच्या मित्रांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर राघवने पोलिसांत तक्रार नोंदवली.परंतु, पोलिसांनी आरोपीविरोधात अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने राघवने नाराजी व्यक्त केली आहे. 'आरोपी बिनधास्त फिरत असून पोलिसांनी त्याला अजूनही अटक केली नाही. तो मला अनेकदा माझ्या इमारतीजवळ दिसला. माझ्या कुटुंबाला काही झाले तर त्याला पोलीस जबाबदार असतील', असे राघवने म्हटले आहे.
राघव तिवारीने ‘चलो दिल्ली’, ‘मेरी कॉम’, ‘पुष्कर लॉज’ आणि ‘रणथंबोर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर, ‘सास बहू और फ्लेमिंगो’, ‘द ट्रायल’ आणि ‘जेंगाबुक द कर्स’ यांसारख्या वेब सीरिजमध्येही त्याने भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, राघववर झालेल्या हल्ल्याच्या निषेर्धात नेटकऱ्यांनी आणि त्याच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशीही त्यांनी मागणी केली जात आहे.
संबंधित बातम्या