मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Crime News: विरारमध्ये मद्यधुंद होऊन धिंगाणा घालणाऱ्या तीन तरुणींना अटक; पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण

Mumbai Crime News: विरारमध्ये मद्यधुंद होऊन धिंगाणा घालणाऱ्या तीन तरुणींना अटक; पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 10, 2024 07:51 PM IST

Mumbai Crime News : विरारमध्ये एका पबमध्ये मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातल्यानंतर तीन महिलांनी पोलिसांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली होती. याप्रकरणी त्यांना अटक केली आहे.

विरारमध्ये मद्यधुंद होऊन धिंगाणा घालणाऱ्या तीन तरुणींना अटक
विरारमध्ये मद्यधुंद होऊन धिंगाणा घालणाऱ्या तीन तरुणींना अटक

Three Drunk Women Arrested : मुंबईत मद्यधुंद अवस्थेत पोलिसांनी शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण करणाऱ्या तसेच त्यांचे कपडे फाडण्याच्या प्रयत्न करणाऱ्या तीन तरुणींना पोलिसांनी अटक केली आहे. दारूच्या नशेत या महिलांनी पोलिसांना शिवीगाळ केली तसेच मारहाण करत त्यांचा ड्रेसही फाडला. विरार पश्चिममध्ये असणाऱ्या गोकुळ टाऊनशिप येथील पंखा फास्ट या बार अँड रेस्टारंटमध्ये दोन दिवसापूर्वी प्रकार घडला होता. या तरुणींचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता पोलिसांनी तिन्ही तरुणींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काव्या प्रधान, पूनम आणि अश्विनी पाटील अशी या महिलांची नावे आहेत. या महिलांनी दारूच्या नशेत बारमधील अन्य ग्राहकांशी वाद घातला. त्यानंतर स्टाफने त्यांना निघून जाण्यास सांगितल्यावर त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली.

याबाबत अर्नाळा सागरी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र मद्यधुंद ३ महिलांनी पोलिस पथकाशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रयत्न केला. महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी उत्कर्षा वंजारी यांनी यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.

आरोपी महिलेने (वय २२) हिने महिला पोलिसांच्या गणवेशाला पकडून ओढले आणि त्यांना धक्काबुक्की करून शर्टाची कॉलर पकडली. तिचा हात सोडवत असताना आरोपीने त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला आणि हाताच्या कोपऱ्याल जोरात चावा घेतला. त्यांना सोडवण्यासाठी पबच्या महिला बाउंसर आल्यानंतर महिलेने तिच्यावरही हल्ला केला.

या तक्रारीनुसार काव्या प्रधान (वय २२) हिने पबमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करत तिचा गणवेश फाडला. पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला चावा घेतला. अश्विनी पाटील (वय ३१)  या महिलेने पोलीस कर्मचारी उत्कर्षा वंजारी यांचे केस ओढले. महिला सुरक्षा रक्षक आकांक्षा भोईर या पबमध्ये त्यांना मदत करण्यासाठी गेल्या असता तिलाही धक्काबुक्की केली. त्यांचा टी-शर्ट फाडण्यात आला. काव्या प्रधानने पोलिस हवालदार मोराळे यांनाही मारहाण केली. त्याच्यांतील तिसरी तरुणी पूनम हिनेही पोलिसांना धक्काबुक्की आणि मारहाण केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवून या तिघींना ताब्यात घेण्यात आले.

आपीसी कलम ३५३, ३२३, ३२५, ५०४ व ५०६ नुसार तिघींवर कारवाई करण्यात आली आहे

IPL_Entry_Point